सासवड, पुणे : सध्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्र पवार (Ajit Pawar) यांची तगडी लढत होण्याची चर्चा असतानाच आता शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला. अजित पवारांची उर्मटपण संपला नाही, असं म्हणत शिवतारेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्यांच्या मी बोलणार नाही, असं ही ते म्हणाले. मात्र हे सगळं पाहून अजित पवारांनी थेट बारामती मतदार संघात सभांचा धडाकाच लावला. आज सासवडच्या पालखीतळ मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा होत आहे. या सभास्थळाच्या प्रवेशद्वारावरच तीनही संभाव्य उमेदवारांचे पोस्टर वॉर रंगले आहे.
शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार जिथून प्रवेश करणार आहेत तिथेच भला मोठा फ्लेक्स लावले आहे. "फिक्स खासदार 2024 बापूंना आपलं एक मत ...दोन्ही पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग" असा आशय त्यावर लिहिला असून बाजूलाच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचाही फ्लेक्स लावण्यात आला आहे. शिवसेनेच्या या फ्लेक्स वर शिवतारे यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नेत्याचा फोटो नाहीये. त्यामुळे शिवतारे अपक्ष मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
पवारांकडे बारामतीचा सातबारा नाही. त्यात अजित पवार त्यांच्या उर्मटपणा सोडत नाही. बारामतीची जनता अजित पवारांच्या विरोधात आहे. ही जनता त्यांना मतदान करणार नाहीत. त्यामुळे बारामतीकरांसाठी मी निवडणूक लढणार आहे, अस म्हणत ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. बारामतीची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. शिवतारेंनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानं अजित पवारांना अडचण येऊ शकते. त्यामुळे शिवतारेंना थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केला जात आहे. हे सगळं घडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवतारेंना मुंबईत बोलवून घेतलं होतं. त्यावेळी शिवतारेंना सात तास उभं ठेवलं. त्यानंतर बैठक घेतली पण दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला.
हे सगळं एकीकडे सुरु असताना आता थेट सासवडमध्ये अजित पवारांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजित पवार शिवतारेंना सासवडच्या मैदानातून काही आव्हान देतात का? किंवा शिवतारेंवर काही हल्लाबोल करतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-