पुणे : वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा राजीनामा दिला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच वसंत मोरेंनी महाविकास आघाडीती प्रमुख्य नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता वसंत मोरेंनी थेट संजय राऊतांची (Sanjay Raut) मुंबईत जाऊन भेट घेतली आहे. आपल्याला पुण्यात संधी मिळे, पुण्याच्या स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करेन, असं ते म्हणाले. पुण्यामध्ये वॉशिंग मशिन नकोच, माझंही मत तेच आहे, मोठं वक्तव्य संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी केलं आहे. 


आपण सध्या फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. पण या सगळ्या भेटीगाठी मी उघडपणे घेत आहे. बंद दरवाजे ठेवून मी कोणत्याही भेटीगाठी घेत नाही आहे. मला पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे,यावर मी ठाम आहे यासाठी मी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहे. संजय राऊत, शरद पवार यांच्या भेटी मी घेतल्या ते सुद्धा सकारात्मक असल्याचं ते म्हणाले. 


पुण्याची जागा काँग्रेसकडे जरी असली  तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे. आमदार रविंद्र धंगेकरांशी मी फोन केला आहे. त्यांना अजून फोन करणारदेखील आहे. तेदेखील माझ्या भूमिकेला साध देतील, असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे. सोबतच कॉंग्रेसचे अरविंद शिंदेदेखील इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. महत्वाचं म्हणजे पुणे लोकसभा लढवण्यासाठी अट्टाहास केला होता. त्यामुळे माझ्या निर्णय झाला असल्याचं वसंत मोरेंनी ठामपणे सांगितलं आहे. 


भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल!


आता महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षात मी जाणार यावर दोन दिवसात निर्णय घेईल. आता मी सध्या कोणत्या पक्षात जाणार यासंदर्भात बोलणार नाही सर्वांशी चर्चा झाल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


 



इतर महत्वाची बातमी-


Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार म्हणाले मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं; सुप्रिया सुळे म्हणतात हे...