एक्स्प्लोर

निर्मला गोगटे आणि बाबा पार्सेकरांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली.

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली. राज्य शासनामार्फत देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची घोषणा केली. आज 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त ही घोषणा करण्यात आली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. निर्मला गोगटेंचा अल्प परिचय मुळच्या मुंबईच्या असलेल्या निर्मला गोगटे यांनी पं. कृष्णराव चोणकर, प्रो.बी.आर. देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन  घेतले. सुरुवातीच्या काळात महिला कला संगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. मुंबईच्या साहित्य संघ मंदिर या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मास्टर दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व,  दाजी भाटवडेकर यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची त्यांना संधी  मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवरुनही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले. बाबा पार्सेकरांचा अल्प परिचय बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही प्रकारांमध्ये बाबांनी दैदिप्यमान कामगिरी केली. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेतल्यानंतर बाबा पार्सेकरांनी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्याबरोबर राहून बाबांनी भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. यानंतर विजया मेहता यांच्याकडूनही काही काळ मार्गदर्शन घेतलं. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आत्तापर्यंत त्यांनी 485 नाटकांचं नेपथ्य केलं. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधर कांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी  फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर,  रामदास कामत, कीर्ती शिलेदार,  रजनी जोशी आणि चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget