पुणे : पुणे पोर्शे कार प्रकरणानंतर पहिल्या दिवसापासून आमदार रवींद्र धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली. ठिय्या आंदोलन केलं. पोलीस आयुक्तालयात निवेदन दिलं. त्यानंतर ट्विटरवरुनदेखील त्यांनी अनेक आरोप केले शिवाय पब आणि बारवर कारवाई करत नसल्याने त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यानंतर आता धंगेकरांनी थेट RTOला धारेवर धरलं आहे. सामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय दिसत आहे. जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला ,RTO ची मनमानी सहन करणार नाही, असा इशारा धंगेकरांनी दिला आहे. धंगेकरांनी ट्विट केलं आहे त्यात त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
तो अगरवाल ३ महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता,अन R.T.O रिक्षावाल्यांना पासिंग उशिरा झाली तर दिवसाला 50 रुपये दंड ठोकतोय.रिक्षावाल्यांना 30 - 30 हजार रुपये भरण्याच्या नोटीस आल्या आहेत. हा रवि धंगेकर गोर गरीब रिक्षावाल्याच्या पाठीशी उभा आहे.जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला RTO ची मनमानी सहन करणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
19 मेला पुण्यात रात्री अडीचवाजता भीषण अपघात झाला. यावेळी पोर्शे कारने दोन इंजिनियर चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या गाडीने दोन तरुणांना उडवलं ती आलिशान पोर्शे कार होती. या कारला ना नंबर होता ना या कारचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. तरीही ही कार पुण्याच्या रस्त्यांवर बेफाम धावत होती. या कारच्या वेगाने आणि बिल्डर पुत्राच्या हुल्लडबाजीने दोघांचा जीव घेतला. त्यानंतर RTOवर अधिकाऱ्यांवरदेखील टीका करण्यात आली. त्यानंतर गाडीची नोंद रद्द करण्यात आली आणि गाडी जप्त करण्यात आली.
तीन महिने ही गाडी बिना नंबर प्लेटची पुण्यात फिरत होती मात्र कोणत्याही पोलिसांच्या हे लक्षात आलं नाही का? साध्या गाडीवर कारवाई केली जाते तर मग सगळ्यात आकर्षण असलेल्या गाडीवर नंबर नाही हे पोलिसांना दिसलं नाही का?,असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले होते. त्यानंतर अनेकांनी RTO वर टीका केली. त्यांनादेखील धारेवर धारलं होतं. त्यानंतर आता धंगेकरांनीदेखील RTO ला धारेवर धरलं आहे.
इतर महत्वाची बातमी-