पुणे : विमानाचे अनेक अपघात आपण पाहिले आहेत. त्यात काही किरकोळ कारणांमुळे झालेल्या अपघाताची संख्या अधिक आहे. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा जीवदेखील गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातच आज पुण्यात विमानाचा मोठा अपघात टळला आहे. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठं भगदाड पडलं आणि त्यामुळे विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परिणामी विमान उड्डाण थांबावावं लागलं. घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठे नुकसान झाले. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या 'फ्युजलाज'ला मोठे भगदाड पडले, तसेच विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचेदेखील नुकसान झाले. त्यामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. या अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.
पुणे विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय 858 गुरुवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते. ऐरोब्रिजला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. या वेळी 'पुश बॅक टग'ची मोठी धडक विमानाच्या खालच्या बाजूस बसली. यात विमानाचा पत्रा कापला गेला अन् भगदाड पडले. ही घटना विमानाच्या अपघातश्रेणीमध्ये येते.
पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने सुमारे 160 प्रवासी दिल्लीला निघाले होते. विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच विमानाचा असा अपघात झाला. धडक झाल्यावर मोठा आवाज आला. वैमानिकांनी तत्काळ विमानाची पाहणी केली. विमानाला भगदाड पडल्याचे लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आले. विमानाच्या पंखांचेदेखील नुकसान झाले आहे. पंख्यांमध्ये इंधन असते. मात्र मोठा धोका टळला.
प्रवाशांचा जीव टांगणीला...
यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे प्रवाशांचा जीव गेला आहे. अशा घटना वारंवार घडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याचं पाहायला मिळतं. मात्र यावेळी धोका टळला आणि प्रवाशांसोबतच अनेकांनी उसासा सोडला.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!