पुणे : 'आज मी गाणार नाही, कारण माझा आवाज खराब झालाय आणि आज मला ट्रोल व्हायचं नाहीये', असं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी म्हटलं. रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर अमृता फडणवीस या जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या, तेव्हा त्यांना गाण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी आज गाणार नसल्याचं म्हणत त्याचे कारणही सांगितले. दरम्यान राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 


आजचा दिवस सुंदर होता, सगळ्यांची इच्छा पूर्ण झालीये. आज रामलल्ला विराजमान झालेत. त्यामुळे मन मोठं ठेवून आजच्या दिवसाचा जल्लोष करा, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पुण्यात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढण्यात आल्या. या शोभायात्रांना अमृता फडणवीसांनी देखील हजेरी लावली होती. 


अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असतानाही राम मंदिराच्या सोहळ्याला हजेरी लावली नाही. उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तसेच त्यांनी गोदातीरी आरती देखील केली. यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, मी उद्धव ठाकरेंना फॉलो करत नाही, त्यांचं काय चालू आहे, तेच मला कळत नाहीये. 


फडणवीसांनी लाईव्ह पाहिला राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा


नागरपुरातील प्रारंभी रामनगर येथील मंदिराला भेट देऊन फडणवीसांनी श्रारामचे दर्शन घेतले. तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा सगळ्यांना अनुभवता यावा, या क्षणाचे साक्षीदार सगळे व्हावे यासाठी परिसरात  एलईडी स्क्रीनद्वारे  थेट प्रक्षेपण करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांनी तिथेच हा सोहळा लाईव्ह पाहिला. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीसांचा कारसेवक म्हणून  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला.


राम मंदिराचे लोकार्पण 


संपूर्ण देशाला ज्या सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली होती तो सोहळा अखेर आज पार पडला. अयोध्येतील राम मंदिरात रामललाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. 


हेही वाचा : 


Ram Mandir : राम मंदिरात दर्शनाची, आरतीची वेळ, मंदिर पूर्ण होण्यासाठी लागणारा अवधी, आरतीसाठी मिळणारे पासेस, तुम्हाला हवी असलेली माहिती एका क्लिकवर