पुण्यात वेश्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर, अमृता फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमधे तर त्याकडे आदराने बघीतले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्तव्य केलं.

Amruta Fadanvis In Pune: वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमधे तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात अमृता फडणवीस बोलत होत्या.
समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखलं जात आहे. वेश्या व्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. समाजाचं संतुलन राखण्याचं काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे. तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा दर्शवला.
तुमच्या या व्यवसायाला सर्वौच्च न्यायालयाचा देखील पाठिंबा आहे.तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे आहोत. तुम्ही कोणत्याही कराणामुळे या व्यवसायात पडल्या असाल तरी देखील तुम्ही सगळ्या या समाजाचा अविभाज्य भाग आहात. जर तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशा विश्वास त्यांनी महिलांना दिला.
आपल्या मुलींना काय करायचं आहे. हे लक्षात घ्या. त्यांना सुरुवात देणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणे देखील महत्वाचं आहे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकतो मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नका. चांगल्या ट्रेनरची नेमणुक करुन तुमच्यासाठी योगा सेशन ठेवेन, असंही यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















