एक्स्प्लोर

Pune Crime News: माणूस की सैतान! मुलासमोरच त्याने केली पत्नीची हत्या...पत्नीच्या गळ्यावर चालवली कात्री; व्हिडिओ केला शेअर, नंतर स्वत:च गेला पोलीस ठाण्यात…

Pune Crime News: खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत आपण खून का केला याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडिया वरती व्हायरल केला आहे.

पुणे: पुण्यात पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे खून केल्याची (Pune Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या मुलासमोरच पत्नीवर कात्रीने वार करून खून केला. त्यानंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना (Pune Crime News) काल बुधवारी (दि. 22) पहाटे खराडीतील तुळजाभवानीनगर भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक करण्यात आली आहे. ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. गल्ली क्रमांक 5, तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी शिवदास तुकाराम गिते (वय 37) याला अटक केली आहे. बुधवारी (दि. 22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.(Pune Crime News) 

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालायात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाड्याच्या घरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याने खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत आपण खून का केला याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडिया वरती व्हायरल केला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला? 

मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा काही करावं. ती माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मारावं लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत. आपली प्रॉपर्टी ती हडप करण्याचा प्रयत्न करत होती, तसंच तिनं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं आपला जीव वाचवण्यासाठी आपण नाईलाजानं तिचा खून केला आहे, असं त्यानं व्हिडिओत म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसत आहेत, तर त्याच्या समोरच्या बाजुला त्यांचा लहान मुलगा बसलेला दिसत आहे, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिली माहिती

या घटनेबाबत पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी माहिती देताना म्हटलं, आरोपी शिवदास 2021 मध्ये कोर्टात नोकरीला लागला होता. नियमानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला स्टेनोसाठी परीक्षा द्यायची होती. जर तो परीक्षा उत्तीर्ण झाला नसता, तर त्याला नोकरी करता येणार नव्हती. त्याने स्टेनोची परीक्षा दिली होती. मात्र, तो नापास झाला होता. त्यामुळे शिवदास याने हायकोर्टात अपील केले होता, त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टान परत सहा महिन्यांनंतर परीक्षा घ्या, तोपर्यंत त्याला नोकरीवरून काढू नका, असा आदेश दिला होता. 

पत्नीला वाटत होते की, पतीने जर परीक्षा उत्तीर्ण नाही केली, तर नोकरी जाईल. त्यामुळे पत्नी त्याला अभ्यास करण्यास सांगत होती. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी पत्नी घरकाम देखील करत होती. दुसरीकडे पतीने गावी काही कर्ज काढून ठेवले होते. त्यातून दोघांत वाद होत होते. बुधवारी पहाटे शिवदास पाणी पिण्यासठी उठला होता. त्या वेळी पत्नी ज्योती देखील उठली. दोघांमध्ये परत वाद झाला. त्या वेळी त्याने कात्रीने वार करून पत्नीचा खून केला. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्यांचा सहा वर्षांचा मुलगा घरात होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीतWalmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Numerology: प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Embed widget