Pune Daund Crime : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीचे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात घडला आहे. पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावात ही घटना घडली आहे. पत्नीने आणि तिच्या घरच्यांनी पहिले लग्न झाल्याचे लपवले तसेच पैशाची मागणी करत त्रास दिल्याने पतीने विषारी औषध प्राशन केले. प्रशांत शेळके असं आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. 


धक्कादायक म्हणजे विषारी औषध प्यायल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये तयार केला आहे. दरम्यान, औषध प्राशन केलेल्या प्रशांत यांचा पंधरा दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी यवत पोलिसांनी पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  त्नी भाग्यश्री पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे, प्रदीप भिवा नेवसे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तिंची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत शेळके याचे भाग्यश्री पिसे हिच्याशी लग्न झाले होते. मात्र भाग्यश्री हिने पहिले लग्न झालेचे लपवून ठेवून प्रशांत बरोबर दुसरे लग्न केले. तसेच त्यास वेळोवेळी पैशाची मागणी करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून प्रशांतनं त्याच्या मोबाईलवरती औषध पित असतानाचा व्हिडीओ तयार केला.


14 फेब्रुवारी 2022 रोजी बोरीपार्धी गावचे हद्दीतील बोरमलनाथ मंदीराचे परिसरात त्याने औषध घेतले. औषध प्राशन केल्याने प्रशांत यास पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा रविवारी  उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. प्रशांत याचे वडील  संपत विठ्ठल शेळके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पत्नी, सासू, सासऱ्यासह एकाविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.










महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha