एक्स्प्लोर

अजित पवारच उपमुख्यमंत्री; पुणे राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी उद्या शुभेच्छांचा कार्यक्रम

उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी अजित पवारांना उद्या पिंपरीत शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या त्यांचं स्वागत करत उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सूतोवाच मिळालेत. म्हणूनच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या(शनिवारी)त्यांचं स्वागत करत उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तसं पत्रक काढून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना कल्पना दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी ते पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या मुलाचे रिसेप्शन आहे. तिथं अजित पवार उपस्थित दर्शवतील. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर फायनल झाली आहे. 30 डिसेंबरला दुपारी विधानभवन परिसरात एकूण 36 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अजित पवारचं उपमुख्यमंत्री होणार - अजित पवार यांनी भाजपशी घरोबा करत राज्यात सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरकार 80 तासांमध्ये पडले आणि अजित पवार यांची घरवापसी झाली. मात्र, बंड केल्यामुळे त्यांचं पक्षातील वजन कमी झाल्याने उपमुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून दूर गेल्याची चर्चा होती. दरम्यान, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप न झाल्याने सस्पेन्स वाढला होता. त्यातच सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिल्यामुळे त्यांची इमेज सुधारण्यास मदत झाली होती. अशातच आता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यात येणार असल्याने अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री फिक्स मानले जात आहे. अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री : संजय राऊत अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत अशा अनुषंगाचं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर आता संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. हेही वाचा - राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद कुणाला? अजित पवार, जयंत पाटील की वळसे पाटील, संभ्रम कायम Ajit Pawar | अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये जागा बदलून गप्पा | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
Maharashtra Rain News: गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget