एक्स्प्लोर

Ajit Pawar In Pune: नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपावरुन अजित पवार संतापले, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा 'लवकरच' हा शब्द आवडीचा झाला आहे. त्यांना कधीही विचारा ते एकच उत्तर देतात.

Ajit Pawar In Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा 'लवकरच' हा शब्द आवडीचा झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळाबाबत कधीही विचारा ते लवकरच असंच उत्तर देत होते आता खातेवाटपाबाबत विचारलं तरी तेच उत्तर देत आहेत. अधिवेशनात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सही करावी लागते. त्यामुळे त्यांनी अधिवेशनापुर्वी खातेवाटप केलं पाहिजे.  स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र यंदा पालकमंत्रीच नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पालकमंत्री नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

या सरकारमुळे राज्याच्या लोकांच्या मनात नाराजी आहे हे पदोपदी जाणवत आहे. ज्या शिवसैनिकांनी यांना निवडून दिलं त्यांच्या मनात नाराजी आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना राजकारणात पुढे कधीच यश मिळालं नाही. महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही,असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीकडून एकत्रित लोकसभा निवडणूक लढवण्यात आली तर चित्र वेगळे असेल. याबाबत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील. आगामी अधिवेशनात लोकांच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा
बारामती विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निर्मला सितारामाण यांचं स्वागत करतो.  बारामतीच्या विकासाची माहिती करुन घेण्यासाठी पंतप्रधान येऊन गेले. त्यासोबतच अनेकजण येऊन गेलेत. त्यांच्याकडून निर्मला सीतारमण यांना माहिती मिळाली असेल.  त्यांनी बारामतीचा विकास पहायला यावे, असंही ते म्हणाले. निर्मला सितारमण यांनी निवडणूकीची जबाबदारी घेतली आहे मात्र कोणी निवडणुकीची जबाबदारी घेतल्याने काही होत नाही.  उद्या मी पण वाराणसीची जबाबदारी घेऊ शकतो. मात्र जबाबदारी घेणाऱ्यांनी विचार करायचा आहे की आपण खरंच काही करु शकतो का?,  आपण वेळ वाया घालवत आहोत, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

एकनाथ शिंदेंनीच घेतलेला निर्णय बदलला
प्रभाग रचनेचा निर्णय बदलण्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे कारण या सरकारला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढं ढकलायच्या आहेत. निवडणूकांसाठी त्यांना आता वेळ हवा आहे. एकनाथ शिंदे यांनीच नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी नवीन प्रभागरचनेचा प्रस्ताव आणला होता आणि आता मुखमंत्री असताना त्यांनीच निर्णय बदलला, या बाबत एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पार्थ पवारांनी त्यांचं ठरवावं
नेत्यांनी फिरलं पाहिजे. लोकांना भेटलं पाहिजे मात्र आपण कोणावर काम कर म्हणून बळजबरी करु शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी काय करायला हवं त्यांनी त्याचं ठरवायला हवं, त्यावर मी त्यांना सल्ला किंवा त्यांच्यावर बळजबरी करत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

लाल सिंग चढ्ढा चित्रपट पाहिला नाही
लाल सिंग चढ्ढा चित्रपट बघितला नसल्याने मी त्यावर काहीही विधान करणार नाही मात्र आता अनेक लोक पब्लिसीटीसाठी बॉयकॉट करा किंवा अनेक प्रकारच्या चर्चा करतात. त्यावरुन जनता आकर्षित होते आणि चित्रपट बघायला जाते. यांचाही पब्लिसीटी स्टंट असू शकतो, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget