एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीचा निर्णय म्हणजे हुकूमशाही: अजित पवार
पिंपरी-चिंचवड: एकाच्या हट्टापायी देशातल्या नागरिकांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पिंपरीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धादरम्यान ते बोलत होते. सरकारकडून नोटाबंदी आणि सोन्याबाबत घेण्यात आलेला निर्णय म्हणजे हुकूमशाही असल्याचंही अजित पवार म्हणाले
'एकाच हट्टापायी लोकांना वेठीस धरणं चुकीचं आहे. निर्णयाला विरोध केल्यास तुम्ही देशविरोधी आणि पाठिंबा दिल्यास देशासोबत हे अतिशय चुकीचं आहे.' अशी थेट टीका अजित पवारांनी मोदींवर केली.
'नोटाबंदीनंतर नगरपरिषदेच्या निवडणुकात मिळालेलं यश म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ होता. नगरपालिका निवडणुकीच्या निर्णयानंतर जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय झाला आहे.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement