एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोंढवा दुर्घटनेतील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अजित पवारांची मागणी
बांधकाम व्यावसायिक करोडो रुपये कमवतात पण रहिवाशांच्या जीवाची परवा करत नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
मुंबई : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर सर्व स्तरातून उमटत टिका होत आहे. आज विधानसभेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोंढवा दुर्घटनेतील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुण्यात मोठे टॉवर उभे केले जात आहेत. पाहिले दोन तीन मजले पार्किंगसाठी वापरले जातात. त्यासाठी खोदकाम करतांना रिटेनिंग वॉलला धोका निर्माण होतो आणि असे अपघात घडतात अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच इमारतीच्या सुरक्षा वॉल आरसीसीच्या असल्या पाहिजे अशी मागणीसुद्धा केली आहे.
कोंढवा दुर्घटनेत परप्रांतातील मजूर असले तरी त्याच्या कुटुंबियांना मदत मिळायला हवी असल्याचेही अजित पवार म्हणाले. बांधकाम व्यावसायिक करोडो रुपये कमवतात पण रहिवाशांच्या जीवाची परवा करत नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.
व्हिडीओ पाहा : पुण्यात मृत्यूचं तांडव
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोंढवा दुर्घटनेप्रकरणी विधानसभेत निवेदन
कोंढवा दुर्घटनेप्रकरणी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यात त्यांनी या प्रकरणी पाच जणांची समिती पुढील चौकशी करुन पुढच्या आठ दिवसात अहवाल सादर करणार असल्याचं सांगितलं. तर एनडीआरएफकडून प्रत्येक चार लाख, बांधकाम महामंडळातून प्रत्येकी पाच लाखांची मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीसाठी प्रस्ताव तयार झाला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या प्रकरणी दोन जणांना अटक झाली असून संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर इतरांचा शोध सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेने आर्किटेक्ट, स्ट्रुकचरल इंजिनियर यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच व्यावसायिकांची लायसेन्स रद्द केले असून पुढील बांधकामांवर प्रतिबंध आणलेत आहेत.
या दुर्घटनेत 5 मृत, 3 जण जखमी असूव हे सर्व मजूर कटीहार जिल्ह्याचे आहेत. दुर्घटनेतील मृतदेह एअर फोर्सच्या विमानातून काल रवाना झाले.
पाहा पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम
1. रात्री 1.30 वाजता मजुरांच्या झोपड्यांवर भिंत कोसळली
2. रात्री 1.40 वाजता घटना ऊघडकीस आली, त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली
3. रात्री 2.00 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल ( रात्रभर कोंढवा पोलीस घटनास्थळी )
4. रात्री 2.15 वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले (स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सहाय्याने मदतकार्याला सुरुवात)
5. रात्री 2.30 वाजता पुणे महानगरपालिकेची डिझास्टर मॅनेजमेंट टीम घटनास्थळी दाखल
पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते, तसेच ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफला मदतीसाठी बोलावण्यात आले.
6. पहाटे 5.00 वाजता एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली
7. सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी नवलकिशोर राम घटनास्थळी पोहोचले
8. सकाळी 8.00 वाजता स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर घटनास्थळी दाखल झाले.
9. सकाळी 8.30 पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले
10. सकाळी 9 वाजता महापौर मुक्ता टिळक घटनास्थळी दाखल (महानगरपालिकेकडून बिल्डरला काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement