पुणे : आपल्या राजकारणाची सुरूवात कशी झाली याची बारीकसारीक सगळी माहिती आमच्या बंधूंनी दिली, त्या मागची भूमिका काय होती ते माहिती नाही. पण माणसाच्या मनात जे येतं, ते बोलून झाल्यावर मन हलकं होतं असं अजित पवार म्हणाले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.
सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी पुतण्या रोहित पवारांना टोमणा हाणला होता. भावकीचा विचार केला म्हणूनच तू निवडून आला, आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय हे लक्षात ठेवावं असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर राजेंद्र पवारांनीही प्रत्युत्तर दिलं. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते असं राजेंद्र पवार म्हणाले.
काय म्हणाले राजेंद्र पवार?
राजेंद्र पवार म्हणाले की, "छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं, मग मी शांत बसलो. त्यावेळेस मला माहित नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते."
बोलून गेल्यावर मन हलकं होतं
राजेंद्र पवारांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, "इंदापूर तालुक्याच्या प्रगतीचा पाया श्री छत्रपती साखर कारखान्याने घातला आहे. त्याची सुरुवात कशी झाली त्या खोलातली जात नाही. कारण आमच्या बंधूंनी पूर्ण बारीकसारीक संदर्भ सांगितला आहे. त्या मागची भूमिका काय होती माहीत नाही. पण माणसाच्या मनात जे येतं, ते बोलून झाल्यावर माणसाचं मन मोकळं होतं. माझी जून 1984 मध्ये माझी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पासून राजकीय सुरवात झाली. काम करत असताना चढ उतार येतात, अडचणीचा काळ आपण पाहिला. याच कारखान्याच्या संचालक पदावरून मी सार्वजनिक जबाबदारी घेतली होती. इथे जादूची कांडी नाही. वेळ लागेल पण आम्ही सर्वजण मजबुतीने उभे आहोत."
काहींनी मला इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊ दिलं नाही. म्हणून मी इथला नाद सोडला आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊन दाखवलं. तिथे एक एकर जमीन घेतली, सभासद झालो आणि आता माळेगावचा चेअरमन झालो. आता माळेगाव कारखान्याच्या बरोबरीने छत्रपती कारखान्याने भाव द्यावा असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांचे पूर्ण भाषण
बारामती तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Speech) यांनी थेट शेतकरी (Farmers), साखर कारखाना (Sugar Factory), रस्ते (Road Development) आणि शिक्षण (Education) या महत्त्वाच्या विषयांवर थेट भाष्य केले. त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवड करून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि गणेशोत्सव (Ganesh Festival) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या.
अजित पवारांनी आपल्या भाषणात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) चा वापर वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "AI मुळे पाण्याची 50% बचत होते आणि शेतकऱ्यांचे उत्पादन (Crop Yield) 40% ने वाढू शकते. ठिबक सिंचन (Drip Irrigation) हा शेतकऱ्यांचा कणा आहे, त्याशिवाय उत्पादन वाढणार नाही."
शिक्षणासाठी मोठा निधी, शाळेच्या इमारतीचे आश्वासन
या आधी शरद पवारांनी डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचा प्रश्न सोडवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी सांगितली. 24 वर्ग खोल्या उभारण्यासाठी एकूण 3.60 कोटी रुपये खर्च येणार असून, यात उर्वरित निधी रयत शिक्षण संस्था देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरज पडली तर मी वैयक्तिक मदत करेन, असे आश्वासनही अजित पवारांनी दिले.
शेतकऱ्यांसाठी रस्ते आणि ऊस हंगामाचा मुद्दा
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, अजित पवारांनी 10 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करत असल्याचे जाहीर केले. डांबरी रस्ता तयार झाल्यानंतर तो कुणी खोदला तर किमान 10 ते 20 हजार रुपयांचा दंड करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित म्हणाले की, बारामती आणि इंदापूरमध्ये दुधाच्या व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. ऊस लागवडीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी उसाचे बेणे बदलण्याचा सल्ला दिला.
AI तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांसाठी आवाहन
अजित पवार म्हणाले, "राजीव गांधींनी संगणक आणला, त्यावेळी टीका झाली. पण आज संगणकाशिवाय जग शक्य नाही. त्याचप्रमाणे, भविष्यात AI वापरणारा शेतकरीच खरा साक्षर मानला जाईल. त्यामुळे AI चा प्रसार सर्व साखर कारखान्यांत करावा."
ही बातमी वाचा: