शिरुर, पुणे : मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला चांगली संधी मिळाली असती, मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत बोलून दाखवली. प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यात अजित पवार हे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. शिरुर तालुक्यातील सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे. त्यासोबतच शरद पवार आमचं दैवत असल्याचंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार आमचं दैवत आहे. त्याबद्दल दुमत नाही. पण प्रत्येकाचा काळ असतो कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन त्यांना संधी द्यायला पाहिजे. मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, पण मी त्यांचाय मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय?, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. आम्ही दिवसरात्र काम केलं. सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बॅंक नव्हती. ती बॅंक वेगळे लोक सांभाळायचे. मी राजकारणात आल्यापासून बॅंक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली आहे. यांचा प्रत्येक शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. एकदा दिलेला शब्द पाळतो.
ही निवडणूक गावकी-भावकीची नाही. पंतप्रधनानांना निवडून द्यायची ही निवडणूक आहे. देशाची निवडणूक असल्याने कोणीही भावनिक होऊ नका. अनेकजण बारामतीत आल्यावर म्हणतात की आम्हाला आमचा मतदारसंघ बारामती सारखा करायचा आहे. आम्ही बारामतीत कामं केली आहेत. उगाच बारामतीचं नाव मोठं झालं नाही, असंही अजित पवार म्हणाले.
मी शरद पवारांना या वयात सोडलं नव्हतं. राजीनामा दिल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करा, असं आमतं मत होतं. मात्र तसं काही घडलं नाही आणि मी निर्णय घेतला, असंही अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हे विकास निधी आणण्यात कमी पडले
अमोल कोल्हे विकास निधी आणण्यात कमी पडले. एकतर ते विरोधी पक्षात होते. दुसरे की ते कलाकार असल्याने ते बिझी राहीले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेवर तयार केलेला सिनेमा चालला नाही. त्याचबरोबर कौन बनेगा करोडपती सारखा कार्यक्रम ते घेऊन येणार होते.. मात्र ते विरोधी पक्षात असल्याने त्यांना तो शो मिळाला नाही आणि ते दुखावले. अमोल कोल्हे निवडणूकीला उभे राहणार नव्हते. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला माहित नाही.
इतर महत्वाची बातमी-
Pune Koyta Gang : पुण्यात कोयते हल्ले सुरुच; सलग दोन दिवस भररस्त्यात कोयते घेऊन राडे
उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा
पाहा व्हिडीओ-