एक्स्प्लोर

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणं महत्वाचं : नाना पाटेकर

पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे.

पुणे : देशभर राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. या राममंदिराच्या निर्मितीवरुन देशात सुरु असलेल्या राजकारणावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केलं आहे. राममंदिराच्या निर्मितीपेक्षा गरीबांच्या पोटात दोन घास जाणं महत्वाचं असल्याचं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे. ग्रीनथंब संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मणेवाडी भागात धरणातील गाळ उपसा करुन वृक्षारोपण करण्यात येत आहे. "काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखच वाटेल. त्यामुळे कोणाला काय वाटतं यावर सगळं अवलंबून आहे. काही जणांना राम मंदिर बांधणं महत्त्वाचं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे" असं नाना पाटकर म्हणाले. देशभरातील शेतकऱ्यांना काढलेल्या किसान मोर्चावरही नाना पाटेकरांनी यावेळी भाष्य केलं. "गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळी असे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण होत नसतील, म्हणून हे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एकटं सरकारही सगळ्या गोष्टी पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळे सामाजिक संस्थानी पुढे येऊन मदतीचा हात गरजवंतांना दिला पाहिजे", असं मत व्यक्त केलं. "कोणतंही सरकार जनतेच्या चागंल्यासाठी काम करत असतं. मात्र सगळ्या गोष्टी करणे सरकारला शक्य नसल्याने त्यांना आपण सहकार्य करणे गरजेचं आहे." मात्र मी कोणत्याही पक्षाचा नसल्याचंही नाना पाटेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Deool Band 2 Pravin Tarde Ganpati Decoration: बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत
बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
Bhiwandi Crime: असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
"हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" आमदार-खासदार विकत घेतल्यानंतर स्वतःच स्वतःला पुरस्कार विकत घेत आहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Pratap Sarnaik : मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget