पुणे : डेटिंग साईटवरून श्रीमंत आणि आयटीयन्स महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून करायचा आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्रीमंत महिल्यांना प्रेमात पाडायचं आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करायचा. अखेर हा उच्चशिक्षित ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून 98 लाखाची रोख रक्कम, एक महागडी कार असा कोट्यवधीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


अनिकेत सुरेंद्र बुबने (वय 31) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील एका श्रीमंत महिलेला फूस लावून आरोपीने तब्बल पावणेदोन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेची एक टीम याचा समांतर तपास करत होती.


तपासादरम्यान आरोपी हा फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियावरील डेटिंग साईटचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या एका डेटिंग अकाउंटची पडतळणी करून एका जुन्या मैत्रिणीचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन आरोपीला बाणेर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर भेटण्यासाठी आला असता आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

असं महिलांना जाळ्यात ओढायचा


यावरून तो श्रीमंत आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीशी मैत्री करायचा. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. लग्नाच्या आमिषाने त्यांच्याशी जवळीक साधायचा आणि त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. ही त्याची फसवणूक करण्याची पद्धत होती. त्याने अशाप्रकारे अनेक महिलांची त्याने फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले.


TOP 100 Updates | देशभरातील महत्वाचे शंभर अपडेट्स एका क्लिकवर