एक्स्प्लोर

Pune Accident : मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; ट्रक आणि टेम्पोच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

मुंबई-बंगळुरु महामार्गावरील पुनावळेजवळ सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि माल वाहून नेणाऱ्या टेम्पोची धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Accident : पुण्यात अपघाताचं (Pune Accident ) सत्र संपायचं नाव घेत नाही आहे.  मुंबई-बंगळुरु महामार्गावरील पुनावळेजवळ सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि माल वाहून नेणाऱ्या टेम्पोची धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांना रावेत येथील खाजगी रुग्णालयात (Pune)  दाखल करण्यात आले आहे. 

एमएच 14, जेएल 1588 क्रमांकाचा लहान टेम्पो वाकडकडून कामशेतला निघाला होता. टेम्पोमध्ये मंडप डेकोरेशनचे साहित्य होतं. टेम्पोत चलाकासह तिघं बसले होते. पुनावळे परिसरात ट्रकने अचानक बाजू बदलली होती. त्यामुळे ट्रकचा ताबा सुटला आणि ट्रक टेम्पोला जाऊन धडकला. या सगळ्यात मागून भरधाव वेगाने येत असलेली कारही धकडली. यात तिघेही ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते. पोलिसांच्या मदतीने तिघांना बाहेर काढलं आहे. शहरात सगळीकडे दिवाळीमुळे उत्साहाचं वातावरण आहे. त्यात पुणे शहरात सकाळीच दोन घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अपघाताचं सत्र संपणार तरी कधी?
काही दिवसांपूर्वी  पुण्यातील एमआयटीमध्ये (MIT) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण (pune accident) अपघात झाला होता. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला होता. पाच जण गंभीर जखमी झाले होते. एक्सयूव्ही 300 गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या असलेल्या दुकानाला धडकली आणि गाडी पलटी होऊन दोघांनी जागीच प्राण सोडले होते. रचित मेहता आणि गौरव लालवानी अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं होती. सासवड कापूरहोळ रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानाला जाऊन धडकली आणि पलटी झाली होती. या अपघातात जखमींमध्ये तीन मुलींचा समावेश होता. अपघातानंतर गावकऱ्यांनी मदत करुन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केलं तर पाच जणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. अपघात झालेले विद्यार्थी हे पुण्यातील एमआयटी कॉलेजचे होते आणि ते विविध विभागात शिकत होते. 

पुणे शहर अपघाताचं प्रमाण वाढलं
पुणे शहरातील आजूबाजूच्या शहरात अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. महिन्याभरात किमान सात ते आठ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. वाहतूक कोंडी, वाहनांच्या वेगावर नसलेलं नियंत्रण, रस्त्यांवरील खड्डे, तरुणांची हुल्लडबाजी ही या अपघाताची कारणं असल्याचं समोर आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा, रश्मी ठाकरे उपस्थित राहणार : ABP MajhaUjjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी : ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 :  ABP MajhaAjit Pawar Pune : अजित पवारांकडून  सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Embed widget