Aashadhi Wari 2023 : दिवे घाटात घुमणार विठुमाऊलीचा गजर, वारीचा कठीण टप्पा आज होणार पार; माऊलींचा सासवडमध्ये मुक्काम

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी शेकडो पुणेकरांनी पालखीला निरोप दिला.

Continues below advertisement

Aashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज (Santa Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Santa Tukaram Maharaj) यांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून (Pune News) सासवडकडे (Saswad News) जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत. भावपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांनी पालखीला निरोप दिला. निवडुंगा विठोबा मंदिर परिसर विठू नामाचा गजराने दुमदुमला होता. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून लोणीकडे प्रस्थान झालं. पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली. तर पालखी विठोबा मंदिरातुन ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन दिवसांच्या विसाव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही मार्गस्थ झाली. 

Continues below advertisement

आजच्या पालखी प्रवासातील माऊलींच्या पालखीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा दिवेघाट आहे. दिवे घाटातील अवघड चढण आणि वळण पार करून माऊलीच्या जयघोषणात पालखी सासवड मुक्कामी असणार आहे. तर तुकाराम महाराजांची पालखी आज हडपसर मार्गे लोणीकाळभोरला मुक्काम करेल. 

लाखोच्या संख्येने पुण्यात दोन्ही पालख्या दाखल झाल्या होत्या. दोन दिवस पालख्यांनी पुणेकरांकडून पाहुणचार करुन घेतला आणि पुणेकरांनी वारकऱ्यांची सेवा केली. त्यासाठी विविध उपक्रमदेखील राबवण्यात आले होते. मोफत नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर त्यानंतर अनेक वारकऱ्यांचा थकवा जाण्यासाठी मालिश केंद्रही उभारण्यात आले होते. 

दोन दिवस पुणेकरांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलोट गर्दी केली होती. संध्याकाळी दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होताच या पालख्यांचं पालिकेकडून आणि हजारो पुणेकरांकडून जय्यत स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर नाना पेठेतील मंदिरात तुकाराम महाराजांच्या पालखीने आणि भवानी पेठेतील पालखी मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने विसावा घेतला. मध्यरात्रीही दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. मात्र सकाळी पुणेकरांनी पाणवलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला.

आज दिवेघाटमार्गी पालखी सासवडला जाणार आहे. त्यापूर्वी पालखीचं दिवेघाटातील दृष्य विहंगम असतो. दिवेघाटातील प्रवास सगळ्या कठीण असतो. याच कठीण प्रवासासाठी वारकरी मार्गस्थ झाले आहेत. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग विद्या धाम पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योग साधक मसाज करुन देतात. एकवेळी साधारण 25 महिला व 25 पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो. हजारो वारकरी या सेवेचा लाभ घेतात. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने यांच्या पुढाकाराने ही वारकरी मसाज सेवा गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aashadhi Wari 2023 : अवघा रंग एक झाला... ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान, भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी दिला निरोप

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola