एक्स्प्लोर

Pune News : पुणे पोलिसांचा अनोखा नियम, कोयता खरेदी करणाऱ्यांना बसणार चाप

Pune Koyta Gang News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. कोयता गँगचे हल्ले रोखण्यासाठी पुणे पोलीस सर्व प्रयत्न करत आहेत.

Pune Koyta Gang News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने (Koyata Gang) धुडगूस घातला आहे. कोयता गँगचे हल्ले रोखण्यासाठी पुणे पोलीस (pune police) सर्व प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नवनवीन शक्कल लढवली जात आहे. आता पुणे पोलिसांनी आणखी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.  पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी हा नियम काढला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात पुण्यातील "कोयता गँग"ची चर्चा सुरु आहे. पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी विशेष पथकं नेमून कोयता गँग मधील अनेक आरोपींना जेरबंद केलं, त्यांची धिंड काढली मात्र अजूनही पुण्यातील या टोळ्यांचे वर्चस्व कमी झालेलं दिसत नाही.

अगदी दोन दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून पुण्यातील नूतन मराठी महाविद्यालयातील अवघ्या 17 वर्षांच्या मुलांनी कोयत्याने हल्ला केला. यात पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांना अटक केली, मात्र कोयता गँगची दहशत कमी कधी होणार हा प्रश्न पुणेकरांच्या मनात कायम आहे. पुणे पोलिसांनी हे हल्ले रोखण्यासाठी आता कोयता खरेदीसाठी आधारकार्ड सक्तीचं केलं आहे.

कोयता हे बाकदार पाते असलेले शेतीचे तसेच बागकामासाठी वापरलेलं हत्यार आहे. कोयत्याचा वापर पिकाची कापणी करण्यासाठी, तसेच शेतातील इतर कामांसाठी केला जातो मात्र अलीकडे याच हत्याराने पुण्यातील तरुणांनी अनेकांना जिवे मारण्याचा, धमकवण्याचे प्रकर सुरू केले आहेत. 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत मिळणारे हे हत्यार शहरातील अनेक ठिकाणी अगदी सहज उपलब्ध होतं मात्र आता कोयता गँग वर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. आता कोयता घेण्यासाठी जाणाऱ्यांना आधार कार्ड द्यायवे लागणार आहे.

 यामुळे इथून पुढे कोयता विक्रेत्यांना कोयते घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्डची एक प्रत घ्यावी लागणार आहे. इतकंच काय तर हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता शहर पोलिस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहे खरं पण यामुळे खरंच गुन्हेगारीला वचक बसेल का हे  प्रश्नच आहे येणारी वेळच सांगेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget