एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, 25 वर्षीय आरोपी अटकेत
एका सहा वर्षाच्या मुलीला घरी बोलावून तिच्याशी अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पुणे : पुण्यातील कोंढव्यात पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे कात्रजमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका सहा वर्षाच्या मुलीला घरी बोलावून तिच्याशी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. देवीलाल उर्फ प्रशांत सागरे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
पुण्यात गेल्या काही दिवसात अशा घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. या घटनांमुळे अनेक पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, अशाप्रकारच्या घटना रोखण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, कोंढव्यात आठ वर्षीय मुलीवर गँगरेप करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांसह एका अठरा वर्षाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीवर गँगरेप, अल्पवयीन मुलं ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement