पुणे : एक लिटर पाण्यामध्ये साधारणपणे दहा जणांची तहान भागते. पण अशा 5 कोटी 18 लाख 40 हजार बाटल्या जेव्हा रिकाम्या होतील, तेव्हा त्या पाण्याची बरोबरी होईल टेमघरच्या गळतीतून वाया जाणाऱ्या पाण्याशी.

 
आता जरा या टेमघरच्या वाया जाणाऱ्या पाण्याचं गणित समजून घ्या. टेमघरमधून सध्या एका सेकंदाला 600 लीटर पाण्याची गळती होते. एका दिवसात 86 हजार 400 सेकंद असतात. गुणाकार केला, तर दिवसाला 5 कोटी 18 लाख 40 हजार लिटर पाणी वाया जातं.

 

पुणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे असी नासाडी अजिबात परवडणारी नाही. पुण्यात प्रतिव्यक्ती एका दिवसाला 140 लिटर पाणी लागलं. भागाकार केला तर तब्बल 3 लाख 70 हजार 285 लोकांचं पाणी फुकट जातं.

 
पुण्याची लोकसंख्या 40 लाखांच्या घरात आहे. म्हणजे 10 टक्के लोकांचं रोजचं पाणी फुकट जात आहे. मिरजेतून दुष्काळी लातूरला वॉटर एक्स्प्रेसमधून दररोज अडीच लाख लीटर पाणी जायचं. टेमघरच्या गळतीचा विचार केला तर अशा दोनशे वॉटर एक्स्प्रेस रोज वाया जात आहेत. हा झाला नासाडीचा मुद्दा, पण सुरक्षेचं काय?

 
टेमघरच्या गळतीप्रकरणी ज्या सोमा एन्टरप्रायझेसला सरकारने क्लीन चिट दिली, त्याच सोमा एन्टरप्रायझेसच्या एमडी राजेंद्र प्रसाद मगंती यांचा तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी टेमघरच्या उत्कृष्ट बांधकामाबद्दल गौरव केला होता. आता हे उत्कृष्ट बांधकाम असेल, तर अशा कंत्राटदार, अधिकारी आणि सरकारचा टेमघरच्या सांडव्यावरच सत्कार करायला हवा