पुणेः अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन वर्ष पूर्ण झाले. हत्येचा आणि तपासातील दिरंगागाईचा निषेध करत अंनिसने पुण्यात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात जोरदार निदर्शनं करण्यात आली.


 

सनातनच्या फरार साधकांचे फोटो प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये लावले जावेत, अशी मागणी यावेळी केली गेली. अंनिसच्या मोर्चात प्रकाश आंबेडकर, सुभाष वारे, बाबा आढाव, अतुल पेठे यांनीही उपस्थिती लावली. दरम्यान तीन वर्ष होऊनही आरोपी न सापडणं ही नामुष्की असल्याचं मत अंनिसचे हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केलं.

 

पुण्यात सनातनचाही मोर्चा

 

पुण्यात आज अंनिसपाठोपाठ सनातन संस्थेनेही मोर्चा काढत आम्ही सारे सनातन म्हणून घोषणा दिल्या. महत्वाचं म्हणजे या मोर्चात सनातन संस्थेने कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांचे फलकही झळकावले.

 

यापैकी वीरेंद्र तावडे हा दाभोलकरांच्या हत्येचा तर समीर गायकवाड हा पानसरेंच्या हत्येचा आरोपी आहे.  पोलिसांनी खबरदारी म्हणून अंनिस आणि सनातन यांना एकाच रस्त्यावरुन मोर्चास परवानगी नाकारली.