Pune Ganeshotsav 2022: पुण्यातील (pune) गणेश विसर्जनसाठी पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा दोन वर्षांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस सज्ज आहे. पुण्यातील गणपतीच्या मिरवणुका पाहण्यासाठी अनेक भाविक आणि पुणेकर गर्दी करतात. त्यावेळी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नात असतात. त्या प्रमाणे शहरात पोलिसांचा मोठा  बंदोबस्त तैनात करण्यात येतो.


यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात 5 हजार पोलीस असणार तैनात असणार आहे. त्यासाठी आजपासूनच शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला सुरुवात करणार आहे. मानाच्या गणपतीबरोबरच शहरातील किमान 3 हजार सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन होण्याचा अंदाज आहे.  सुमारे 85 ठिकाणी घाटावर गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. दरवर्षी अनेक तास या मिरवणुका सुरु असतात मात्र या वर्षी लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे.


पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूकिमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. पुण्यातील 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.. गणपती विसर्जनाची मिरवणूक ज्या मुख्य रस्त्यावरन जाते ते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. दरवर्षी लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर असणार मुख्य विसर्जन मिरवणूकीचा मार्ग असतो. त्यामुळे या मार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्याच बरोबर उद्या प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद असणार आहे. रात्री विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत या सगळ्या रस्त्यांवरुन वाहतूक बंद असणार असल्याचं पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितलं आहे.


भाविकांसाठी पार्किंगची सोय
मिरवणुकीदरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यात गरवारे कॉलेज, कर्वे रोड, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी टिळक रोड, कॉंग्रेस भवन मनपा रोड, मनपा भवन पार्किंग,  सी. ई. ओ. पी  ग्राउंड, मंगला टॉकीज, हमालपाडा पार्किंग नारायणपेठ, नदीपात्रातील रस्ता, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड, आपटे प्रशाला या ठिकाणी मिरवणुकी दरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे.


हे रस्ते असणार बंद
लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बगाडे रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, गुरुनानक रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता सकाळपासून वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. त्यासोबतच कर्वे रस्ता, फर्ग्यूसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता हे सगळे रस्ते उद्या दुपारी 12 नंतर  वाहतूकीसाठी बंद असणार आहे.