Pune Ajit Pawar News: पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar) मॅरेथॉन दर्शन दौरा असणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस गणपती मंडळाच्या (Pune Ganeshotsav2022) आरत्या पवारांच्या हस्ते होणार आहेत. या दर्शन दौऱ्यासाठी अजित पवारांनी विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त शोधला आहे. दुपारी अडीच ते रात्री रात्री साडे नऊ असा सात तासांचा हा मॅरेथॉन दौरा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील गणपतींचं दर्शन घेणाऱ्या अजित पवारांनी पुणे शहरातील गणपतींसाठी विसर्जनाचा दिवस राखून ठेवला आहे.



या मंडळांना देणार भेट
श्रीकृष्ण मित्र मंडळ, काळेवाडी,नव महाराष्ट्र मित्र मंडळ लांडेवाडी, ओमटी, शिवप्रताप मित्र मंडळ रहाटणी, गव्हाणे तालीम मित्र मंडळ, शिवशंभो सेवा मंडळ,महादेवमंदिर, भोसटी गावठाण पिंपळे सौदागर, खंडोबा मित्र मंडळ भोसटी, अमरदीप तरुण मंडळ, पिंपरी गाव, ज्योती मित्र मंडळ, पिंपटी गाव, तनिष आर्किड सोसायटी, चऱ्होली, पवना मित्र मंडळ पिंपटी गाव, ग्रीन सोसायटी बाटणे वस्ती, अष्टविनायक मित्र मंडळ, पिंपटी गाव,  सोसायटी शिव मोक्षी, शिवाजी उदय मंडळ, चिंचवडगाव, प्राधिकरण जागी समिती सेक्टर, गांधी पेठ तालीम, चिंचवडगाव, डी मार्टजवळ, शिवाजी तरुण मंडळ,थेरगाव, जय बजटंग तरुण मंडळ निगडी, आनंद नगर मित्र मंडळ पिंपळे गुरव, श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सुर्यमुखी गणेश मंदिर, पिंपळे गुरव, हनुमान व्यायाम मंडळ चिखली गावठाण, विठ्ठल तरुण मंडळ, दापोडी, अभिमन्यू फ्रेन्ड सर्कल.माने चौक,जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ, कासारवाडी या सगळ्या मंडळांना विरोधी पक्षनेते अजित पवार भेट देणार आहेत.



पुणे शहरातील गणपतींसाठी विसर्जनाचा दिवस राखीव
मुख्यमंत्री आणि अनेक पक्षातील नेते मंडळींनी यंदा दोन वर्षांनी होणाऱ्या गणेशोत्सवात पुण्याची मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्याबरोबर दगडूशेठ मंदिराची देखील आरती केली. मात्र या सगळ्यात अजित पवारांनी पुण्याच्या गणपतींसाठी विसर्जनाचा दिवस राखून ठेवला आहे. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्यामुळे अनेक नेते मंडळी राजकीय दौऱ्याबरोबरच गणपतीचे दर्शनाचा कार्यक्रम देखील आखला होता. मी गेली तीस वर्षे शहरात येतोय, गणेशोत्सवात ही येत राहिलोय. मी कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशा गोष्टी करत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी श्रद्धेपोटी आणि समाधानासाठी येत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


मुख्यमंत्र्यांनी काल असाच मॅरेथाॅन दौरा केला होता. त्यात त्यांनी दिवसभरात मानाच्या पाच गणपती आणि पुण्यातील महत्वाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. अनेकदा मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यात आढावा बैठका वगैरे असतात मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात गणपती मंडळ टू गणपती मंडळ असा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पावसानेदेखील हजेरी लावली होती. त्यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी देखील झाली होती.