Pune News : पुणे कस्टम विभागाने (Pune Custom Department) पुणे विमानतळावर (Pune Airport) एक मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने 75 कॅरेट वजनाचे सुमारे 3 हजार हिरे यावेळी जप्त केले आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटच्या (Air intelligence Unit) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी एकाला अटक देखील केली आहे.


नुकतीच 17 मार्च रोजी पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला मिळालेल्या माहितीनुसार शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली, चौकशी करत असतानाच त्या वेळेस त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली असता सुमारे तीन हजार हिरे असल्याची माहिती समोर आली.


48 लाखांचे हिरे जप्त


पुणे कस्टम विभागाला या संपूर्ण कारवाईमधून एकूण 75 कॅरेट वजनाचे सुमारे 3 हजार हिरे आढळून आले आहेत. या हिऱ्यांची किंमत एकूण 48.66 लाख इतकी आहे. हे हिरे संबधित प्रवाशाच्या सामानात आढळून आले आहेत. आरोपीने हे हिरे त्याच्या सामानात असलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. अधिकाऱ्यांनी सामनाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना हे हिरे आढळून आले.


हे ही वाचा



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live


[yt][/yt]