ED attaches Shridhar Patankar's Properties:  महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं कारवाई केलीय. तसेच श्रीधर पाटणकर यांची ठाणे येथील 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केलीय. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. यावर भाजपचे माजी खासदार आणि किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून आक्रमक प्रतिक्रिया दिलीय. तसेच घोटाळेबाजांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केली असून त्यांची ठाण्यातील मालमत्ताही जप्त करण्यात आलीय. या ट्विटमध्ये त्यांनी घोटाळेबाजांना सोडणार नसल्याचाही इशारा दिलाय. 


किरीट सोमय्यांचं ट्वीट-



श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ
श्रीधर पाटणकर यांची ठाणे येथील जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.


राज्यातील राजकारणात थिणगी पडण्याची शक्यता
याआधी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांविरोधात ईडीनं कारवाई केली होती. संबंधित नेत्यांवर ईडी, आयकर विभागानं छापेमारी करून कारवाई केली. परंतु, आता थेट उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरच ईडीनं कारवाई केल्यानं राज्यातील राजकारणात आणखी थिणगी पडण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha