एक्स्प्लोर
पुण्यातील हडपसर भागात 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू
एवढ्या मोठ्या संख्येने कुत्र्यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. म्हाडा कॉलनीजवळ काल 15 कुत्री मृतावस्थेत आढळून आली.

पुणे : पुण्यातील हडपसर भागात 15 कुत्री मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कुत्र्यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. म्हाडा कॉलनीजवळ काल 15 कुत्री मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती शनिवारी हडपसरच्या रहिवाशांना समजली. रहिवाशांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. मृतावस्थेत सर्व कुत्री आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी माहिती ताबडतोब हडपसर पोलिसांना दिली. सर्व मृत कुत्री पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. रस्त्यावरील एवढ्या मोठ्या संख्येत कुत्री एकत्र मरण पावली आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा हा मृत्यू नैसर्गिक नसून कोणीतरी खाण्यातून विष देऊन हे कृत्य केलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha





















