एक्स्प्लोर

Puja Khedkar: लेकीचा हट्ट पुरवणं पडणार महागात? पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी आणखी वाढल्या

Puja Khedkar: दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Puja Khedkar: राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकरचे (Puja Khedkar) वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती.

पूजा खेडकर (Puja Khedkar) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना दिलीप खेडकर (Dlilip Khedkar)  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला (Puja Khedkar) स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्याबाबतची तक्रार देण्यात आली होती त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानंतर दिलीप खेडकर (Dlilip Khedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

पूजा खेडकरला (Pooja Khedkar) जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावं, कार्यालयातील कामकाजात शिपाई उपलब्ध करून देण्यासाठी दिलीप खेडकरांनी (Dlilip Khedkar) कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. दीपक आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज (बुधवारी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र ते काल जाऊ शकले नाहीत.

प्रशिक्षण काळात पूजा खेडकरने (Pooja Khedkar) स्वतंत्र दालनाची मागणी केली होती. तसेच कारला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) मागण्यांविरोधात तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर दिवसे यांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला. त्यानंतर पूजा खेडकर आणि कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत.

पूजा खेडकरचं आयएएस पद रद्द

मात्र पूजा खेडकरने (Puja Khedkar) ट्रेनी असताना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टींसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.आपल्या मुलीला हवं ते मिळावं म्हणून वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली. त्यात आता तिचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, आता दबाव टाकल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी कामात अडथळा आणला याबाबत तक्रार अर्ज बंडगार्डन पोलिसांकडे दिला होता.त्यानंतर आता दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget