Yugendra Pawar, बारामती : बारामती कोणाची घरातील सर्वात ज्येष्ठ शरद पवारांची? की वेगळी चूल मांडणाऱ्या अजित पवारांची? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बारामतीकरांनी याआधी लोकसभेला ईव्हीएमचं बटण दाबलं होतं. आणि आता पुन्हा एकदा बारामतीकरांना त्यांचा राजकीय कैवारी म्हणून कोणत्या पवारांना विधानसभेत पाठवायचं? हे ठरवायचंय.
होय...चर्चा आता चर्चा राहिलेली नाही. ती खरी ठरलीय. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभे राहिलेत. बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनीच तशी वक्तव्य केली. मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता अजित पवार बारामतीतून विधानसभा लढताहेत. अजितदादांच्या नावाची घोषणा होईपर्यंत शरद पवारांनी देखील पत्ता उघड केला नव्हता..
लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी जरी उमेदवार असल्या, तरी खरी लढाई ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होती. आणि ही लढाई शरद पवारांनी जिंकली. आता तर स्वतः अजित पवार मैदानात आहेत. आजवरचा विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर नावाप्रमाणे दादा बारामतीत अजितच राहिले आहेत.
युगेंद्र पवार कोण आहेत?
युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. जन्म तारीख - 22 एप्रिल 1991 रोजी झालाय. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण घेतलंय. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत.
अजितदादांची कारकिर्द -
अजित पवार 1991 पासून सलग सातवेळा बारामतीची आमदार आहेत. पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी अजित पवारांची 30 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. अजित पवारांचा हा बायोडाटा वाचल्यानंतर कोणता? नवखा उमेदवार बारामतीच्या आखाड्यात उतरेल. पण हे धाडस करणार आहे युगेंद्र पवार..कारण त्यांचा गॉडफादर आहे.. शरद पवार आहेत. शरद पवार काय चीज आहे हे अजितदादांनाही माहिती आहे... आणि अजितदादा किती बडी आसामी आहे हे शरद पवार देखील चांगलेच ओळखून आहेत..म्हणूनच यंदाच्या बिग फाईटमधली सर्वात टॉपवर बारामती असणार आहे. आता शरद पवारांनी अजितदादांविरोधात ज्या नातवाला उतरवलंय, त्या युगेंद्र पवारांविरोधात जाणून घेऊयात
शरद पवार असो किंवा अजित पवार या दोघांसाठी यंदाची बारामतीची निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे? हे शब्दात सांगणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. आता लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजितदादांनी कोणती रणनीती आखली आहे. आणि अजितदादांना पराभवाचा चेहरा दाखवण्यासाठीशरद पवार कोणता डाव टाकणार? याकडे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या राजकीय पंडिताचं लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या