Chhagan Bhujbal Net Worth : राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. दरम्यान, छगन भुजबळांनी आज (दि.24) उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. दरम्यान, शरद पवारांची साथ सोडल्यामुळे या निवडणुकीत छगन भुजबळांसमोर मोठं आव्हान असेल, असे बोलले जात आहे.
मंत्री छगन भुजबळ मालमत्ता विवरण, 12.50 कोटींचे धनी...
मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचे विवरण सादर केले आहे. भुजबळ यांची वैयक्तिक जंगम मालमत्ता 1 कोटी 32 लाख 66 हजार 235 रुपये असून स्थावर मालमत्तेचे मुल्य 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपये आहे.
भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम व पत्नीच्या नावे 455 ग्रॅमचे सोनं
पत्नी मिना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रूपये जंगम तसेच 16 कोटी 53 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. छगन भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम व पत्नीच्या नावे 455 ग्रॅमचे सोनं आहे. भुजबळ यांच्या नावे ट्रॅक्टर असून पत्नी मिना यांच्या नावे पिकअॅप वाहन आहे. विविध ठिकाणी मालमत्ता असून त्यामध्ये रहिवासी व शेत जमीनींचा समावेश आहे. भुजबळांच्या नावे 24 लाख 56 हजार तर मिना भुजबळ यांच्या नावे 21 लाख 10 हजार 250 कर्ज आहे. दरम्यान, भुजबळांच्या नावावर विविध केसेस दाखल आहेत.
2019 च्या निवडणुकीत दिलेली माहिती भुजबळांची जंगम मालमत्ता
हातातली रोख रक्कम – 1 लाख 3 हजार 160 (पत्नीकडे – 51700 रुपये)
बँकातील ठेवी – चार बँकांमध्ये अनुक्रमे 12 लाख 66 हजार 56 रुपये, 2 लाख 9 हजार 378 रुपये, 2 लाख 9 हजार 381 रुपये आणि 2 लाख 9 हजार 380 रुपये, बँकेतील ठेवी – 46 लाख 20 हजार 787 (पत्नीकडे – दोन बँकांमध्ये अनुक्रमे – 5 लाख 89 हजार 470, 1 लाख 64 हजार 170)
बाँड्स, शेअर्स – 1 लाख 62 हजार 52 रुपये, पत्नीकडे 25 लाख 25 हजार 100 रुपये
सोने – 21 लाख 6 हजार रुपये
इतर ठेवींसह एकूण जंगम मालमत्ता – 1 कोटी 1 लाख 25 हजार 794 (पत्नी – 1 कोटी 65 लाख 20 हजार 191 रुपये)
स्थावर मालमत्ता
सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता – 10 कोटी 38 लाख 94 हजार 639 रुपये (पत्नीकडे – 13 कोटी 88 लाख 98 हजार 674 रुपये)
एकूण कर्ज – 38 लाख 24 हजार 426 रुपये
इतर महत्त्वाच्या बातम्या