मुंबई :  महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi Melava)  मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांचा उल्लेख गुलाबी सरडा असा केला. यावर शरद पवारांच्या पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी आक्षेप घेतला आहे. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, अशी टीका करणं योग्य नाही असं युगेंद्र म्हणाले.ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 


महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाषण करताना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी  भाजप, मोदी आणि अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या 'पिंक' जॅकेटमुळे चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री, अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख केला.  याविषयी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले,  मी खाली बसलो होते. ते स्टेजवर बसले होते. ते काय बोलती यावर आमचा कंट्रोल नाही. काही गोष्टीत  ते बोलतील  ते सगळच आम्हाला आवडते किंवा पटते असे नाही. कारण शेवटी कौटुंबिक संबंध देखील आहेत. 


प्रत्येक टीका मला आवडतेच असे नाही : युगेंद्र पवार


राजकारण बाजूला ठेवले तर ते माझा काका आहे. त्यामुळे  सगळेच जेव्हा त्यांच्यानर टीका करतात ती टीका मला आवडतेच असे नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत. 


जय पवार निवडणूक लढवणार असेल तर.... युगेंद्र पवार म्हणाले


बारामतीमध्ये निवडणूक कोण लढणार हे ज्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा सुटेल त्यानंतर ठरेल. सध्या उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही . जय पवार सोबत अद्याप माझं बोलणं झालेला नाही मात्र तो निवडणूक लढणार असेल तर शुभेच्छा... एवढ्या दिवसांचा मतदार संघ त्यांना का सोडावा लागतोय याचे उत्तर तेच देऊ शकतात, असे युगेंद्र पवार म्हणाले. 


काय म्हणाले संजय राऊत?


 सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी  रंग बदलला आता पिंक झाले आहेत.  सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही.  पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे.  केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा... एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवाचं तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे.


हे ही वाचा :


अल्ला किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, दोनवरच थांबा, अजितदादांचा प्रेमळ दम!