Lok Sabha Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT Shivsena Party) गटाने लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपमधून घरवापसी केलेल्या ठाकरेंकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. ठाकरे गटाने 17 उमेदवारांची नावे जाहीर केली असून यामध्ये संजय देशमुखांना संधी देण्यात आली आहे.


भाजपमधून घरवापसी केलेल्या ठाकरेंकडून लोकसभेचं तिकीट


पूर्व राज्य मंत्री संजय देशमुख यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. शिवसेना, भाजप, शिवसेने असा प्रवास केलेल्या संजय देशमुख यांनी घरवापसी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी संधी दिली आहे. संजय देशमुख हे शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ देण्यात आलं आहे.


कोण आहेत संजय देशमुख? : Who is Sanjay Deshmukh?


संजय महाजन यांनी 1998 मध्ये शिवसेनेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. संजय देशमुख संजय राठोडांसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पूनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मते मिळवली होती.


संजय देशमुख माजी राज्यमंत्री राजकीय कारकिर्द



  • 1996 : दिग्रस शिवसेना तालुका प्रमुख

  • 1998 : यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख 

  • यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक 2008 पासून आजपर्यंत

  • 1999 ते 2004 : अपक्ष आमदार दिग्रस, आर्णी मतदार संघ 

  • 2002 ते 2004 : क्रीडा आणि खनिकर्म राज्यमंत्री 

  • 2004 ते 2009 : अपक्ष आमदार दिग्रस, आर्णी मतदार संघ 

  • मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दारव्हा-दिग्रस-नेर मतदार संघ

  • 2009 : काँग्रेस पक्षाचे उमेदवार, संजय राठोड यांच्याकडून पराभूत

  • 2019 : अपक्ष उभे राहिले, संजय राठोड यांच्याकडून पराभूत


महायुतीचा उमेदवार कोण?


यवतमाळ - वाशिम मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास इथे भावना गवळी उमेदवार राहतील की त्यांच्या जागी संजय राठोड यांना संधी दिली जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :