ABP News Survey On New Congress President: काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून अंतर्गत राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे आहेत. यावर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 4361 लोकांची मते जाणून घेतली आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी केलेल्या संवाद आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.


सर्वेक्षणात विचारण्यात आले होते की, काँग्रेस अध्यक्ष कोणाला बनवायला हवे? सर्वेक्षणात या प्रश्नाच्या उत्तरात 46 टक्के लोकांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. 13 टक्के लोकांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची निवड केली. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या बाजूने 11 टक्के लोकांनी मतदान केले. 30 टक्के लोकांनी सांगितले की या तिघांपैकी कोणीही नाही, असं मत व्यक्त केलं आहे.


काँग्रेस अध्यक्ष कोणाला बनवायला हवं? 


1. राहुल गांधी-          46%
2. अशोक गेहलोत-    13%
3. शशी थरूर-          11%
4. यापैकी कोणीही नाही-  30%


दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना गेल्या 22 सप्टेंबरला जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही आजपासून सुरू झाली आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. राहुल गांधी निवडणूक लढवणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावे आघाडीवर आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. अशा परिस्थिती या शर्यतीत आणखी नावांचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. तसेच यावेळी गांधी कुटुंबातील कोणीही अध्यपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Cyber frauds : चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ 
अंकिता भंडारी हत्या प्रकरण, आरोपी पुलिकत आर्यच्या वडिलांची भाजपमधून हकालपट्टी