Lok Sabha Election 2024 C Voter Survey : मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांना (Lok Sabha Election 2024) आता रंग भरतोय. राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवारांची रोजच्या रोज घोषणा होत आहे. अशा परिस्थितीत मतदारराजा काय विचार करतोय? तो कोणाला मतदान करणार आहे? काय आहे मतदारांच्या मनात? हे सारं एबीपी माझा (ABP Majha) आणि सी व्होटरनं (C Voter) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचा मूड काय? ते गेल्या मार्च महिन्यात आम्ही पाहिलं होतं, आता पुन्हा एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचा मतदार काय विचार करतोय? याचा निष्कर्ष आता समोर आला आहे. महाराष्ट्रातल्या मतदारांना आम्ही सात विविध प्रश्नांची उत्तरं विचारली होती. त्याची उत्तरं काय काय आलीत, हे सविस्तर पाहुयात...
महाराष्ट्राच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक म्हणजेच, एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली आहे. एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी हवे आहेत, असं म्हटलं आहे. तर सहा टक्के लोकांना दोघेही पंतप्रधानपदी नको आहेत, असं म्हटलं आहे. तर 4 टक्के लोकांना सांगताच आलेलं नाही की, त्यांना नेमकं काय हवं आहे.
महाराष्ट्रात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात, असं सर्वे सांगतो. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के तुलनेनं कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी आहे. 4 टक्के लोकांना काहीच सांगता आलेलं नाही.
महाराष्ट्रातल्या मतदारांना आम्ही सात विविध प्रश्नांची उत्तरं विचारली होती. या सर्वेक्षणातून काय निष्कर्ष आलाय, पाहुयात सविस्तर...
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
पंतप्रधानपदी कोण हवं?
- नरेंद्र मोदी : 61 टक्के
- राहुल गांधी : 29 टक्के
- दोन्ही नाही : 6 टक्के
- सांगता येत नाही : 4 टक्के
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
महाराष्ट्रात कोणाला किती मते?
- एनडीए : 41 टक्के
- इंडिया : 41 टक्के
- इतर : 18 टक्के
महाराष्ट्राचा मूड काय आहे ? (स्रोत-सी वोटर)
दोन ओपिनयन पोलमध्ये काय फरक?
एप्रिल | 41 टक्के | 41 टक्के | 18 टक्के |
मार्च | 43 टक्के | 42 टक्के | 15 टक्के |
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
केंद्र सरकारवर किती समाधानी ?
- खूप : 31 टक्के
- कमी : 30 टक्के
- असमाधानी : 35 टक्के
- माहित नाही : 4 टक्के
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
राज्य सरकारच्या कामावर किती खूष?
- खूप : 23 टक्के
- कमी : 34 टक्के
- असमाधानी : 37 टक्के
- माहित नाही : 6 टक्के
मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर जनता किती संतुष्ट?
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती खूष?
- खूप 30 टक्के
- कमी 28 टक्के
- असमाधानी 35 टक्के
- माहित नाही 7 टक्के
महाराष्ट्राचा मूड काय आहे? (स्रोत-सी वोटर)
पंतप्रधानांच्या कामावर किती खूष?
- खूप 43 टक्के
- कमी 27 टक्के
- असमाधानी 28 टक्के
- माहित नाही 2 टक्के
पाहा व्हिडीओ :