Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील इंडिया आघाडी (INDIA Alliance) असं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपसोबत एनडीए (NDA) आघाडीतील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात जोर लावला आहे. दुसरीकडे काँग्रेसही रिंगणात उतरली असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी कोणता पक्ष कोणता पक्ष बाजी मारणार याबाबत विविध शक्यता वर्तवल्यात जात आहेत.
कोणता पक्ष जनतेचे प्रश्न सोडवेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात चांद्रयान-3 चंद्रावर उतरवलं. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे, जागतिक स्तरावर भारताची ताकद, आर्थिक आणि देशांतर्गत देशाची ताकद वाढवणे, या गोष्टी घडल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडी बेरोजगारी, महागाई आणि अल्पसंख्याक आणि दलितांवरील भेदभाव आणि देशातील सत्ताधारी पक्ष भाजपकडून जनतेची कथित फसवणूक आणि अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत आहे.
भाजप आणि काँग्रेसपैकी कुणावर जास्त विश्वास?
एबीपीने सी व्होटर सर्व्हेने देशवासीयांकडून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचा कोणत्या पक्षावर जास्त विश्वास आहे, हे एबीपीने सी व्होटर सर्वेक्षणात समोर आलं आहे. देशभरातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष जनतेचे कोणता प्रश्न सोडवू शकतो, यावर लोकांची मते जाणून घेतली आहे. या सर्व्हेमध्ये जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते जाणून घ्या.
जनतेची प्रतिक्रिया काय?
एबीपी न्यूज सी व्होटरच्या (ABP Cvoter Survey) सर्वेक्षणात लोकांनी काँग्रेसपेक्षा भाजपवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. देशभरातील 32 टक्के लोकांनी समस्या सोडवण्यासाठी भाजपवर विश्वास असल्याचे म्हटले आहे, तर केवळ 17 टक्के लोकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच वेळी, या दोन पक्षांऐवजी इतर कोणत्याही पक्षावर विश्वास व्यक्त करणारेही 5 टक्के लोक आढळून आले आहेत. विशेष म्हणजे 46 टक्के लोकांनी देशातील कोणत्याही पक्षावर अविश्वास व्यक्त केला असून यापैकी कोणताही पक्ष पूर्णपणे समस्या सोडवू शकत नसल्याचे म्हटले आहे.
तुम्ही पंतप्रधानांच्या कामावर किती समाधानी आहात?
- खूप समाधानी - 51%
- कमी समाधानी - 24%
- असमाधानी - 23%
- माहित नाही - 2%
महत्त्वाच्या इतर बातम्या :