Maharashtra: महाराष्ट्र कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) पत्र लिहलंय. नाना पटोले यांना पदावरून काढा, अशी मागणी बावनकुळे यांनी पत्रातून केलीय. मतभेद असले, तरी राष्ट्रीय हिताच्या वेळी सर्व पक्षांनी मतभेद विसरले पाहिजे. काँग्रेसही नाना पाटोलेची विकृतीस खपवून घेते हे सर्वांना खटकते आहे असंही या पत्रात म्हटलंय.


बावनकुळे यांनी सोनिया गांधींना लिहलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्यानं समाजविघातक वक्तव्य करून सामजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारीक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते, तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्रित यावे, हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहित आहे."


"नाना पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधान केली आहेत. या विधानामुळं समाजमन संतप्त आहे. पटोलेंनी काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं समाजातील सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया आलीय. पटोलेंचा सर्वांनीच तीव्र निषेध केलाय."


"राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना पटोलेंनी महात्मा गांधींच्या हत्येचा 'वध' असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो. महापुरुषांचा नाही. ही सामन्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे."


"या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल नाना पटोलेंनी माफी देखील मागितलेली आहे. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्ष विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे."


"पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माम करीत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांन पदावरून तातडीनं बरखास्त करावं," अशीही विनंती बावनकुळे यांनी पत्रातून केलीय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha