Jalgaon: पाणी टंचाई समस्या सुटण्यात तांत्रिक अडचणी असल्याने आकाशातून पाणी देऊ का, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले होते. त्यावर मोठा गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जनतेत मोठी नाराजी व्यक्त केली जात असल्याचं लक्षात आल्यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी थेट जनतेची मागितली आहे.
पाणीपुरवठा मंत्र्यांच्या तालुक्यात पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आकाशातून पाणी देऊ का, असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज स्पष्टीकरण देत पाणीटंचाईमुळे हाल होत असलेल्या धरणगावकरांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.
नदीत असलेला मोटार पंप तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. तसेच नदीला पाणी नसल्यामुळे आकाशातून पाणी टाकू का, असं वादग्रस्त वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत दिवाळीत पाणीटंचाईमुळे हाल होत असलेल्या धरणगावकरांची माफी मागितली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवारी जळगाव आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास करण्यात आला आहे. गाळ साचल्याने पाणी पुरवठा करणारा पंप बंद आहे. त्यामुळे पाणी कसे टाकता येईल, असं मला म्हणायचं होतं, असेही स्पष्टीकरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल आहे. मात्र विरोधकांकडे भांडवल करण्यासारखं दुसरं काही नसल्याने त्यांनी माझ्या वक्तव्याचा ध. चा.मा केल्याच मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. धरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे निलेश चौधरी होते. त्यामुळे ज्यांनी लोणी खाल्ल त्यांनी ताकाच बोलू नये म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाई वरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे निलेश चौधरी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
जळगाव जिल्ह्यात ज्या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला किंवा सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी त्याबाबत चर्चा करून लवकरात लवकर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या: