Voter List Issue: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात एकाच महिलेचं तब्बल सहा वेळा नाव आलं आहे. समाज माध्यमामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने या महिलेला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर महिला विभागात राहात नाहीय. याबात माजी नगरसेवक अतुल सालुंखे यांनी 18 मार्च 2025 ला निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. 

Continues below advertisement

विधानसभेच्या मतदार यादी भाग क्रमांक 286 मधील सुषमा गुप्ता या 39 वर्षीय महिलेचं तब्बल सहा वेळा नाव आल्याने समाज माध्यमावर याची बरीच चर्चा झाली. या सुषमा गुप्ताला एबीपी माझाची टीमने शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सुषमा गुप्ताबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. या प्रभागाचे माजी नगरसेवक आणि माजी सभापती अतुल सालुंखे यांच्या प्रभागाच्या निवडणूक यादीत सुषमा गुप्ता हिचं नाव होतं. अतुल सालुंखे आणि एबीपी माझाचे टीमने संपूर्ण प्रभाग पिंजून काढला माञ सुषमा गुप्ता ही सापडलीच नाही. या प्रभागात सर्व इमारती असून, जीवदानी माता चाळ अशी कोणतीच चाळ नसल्याची माहिती अतुल सालुंखे यांनी दिली आहे. 

निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही-

अतुल सालुंखे यांनी याबाबत दिनांक 18 मार्च 2025 रोजीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र निवडणूक आयोगाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. अशी अनेक नावे दुबार आली आहेत. दुसऱ्या प्रभागाची नावे या प्रभागात आली आहेत. दुसऱ्या ठिकाणचे मतदार या प्रभागात आल्याने वर्षभर काम करत असताना, दुसऱ्या प्रभागातील मतदार आम्हाला कसे ओळखतील असा सवाल व्यक्त करुन, निवडणूकीच्या मतदार याद्या मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जो मतदार याद्या बाबत मुद्दा उपस्थित केला आहे. तो बरोबर असल्याचं म्हणून त्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश-

 सुषमा गुप्ता या महिलेचा एका मतदान केंद्रावर पाच ठिकाणी नाव तर दुसऱ्या मतदान केंद्रावर एका ठिकाणी नाव आढळून आले आहे. समाज माध्यमांमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने निवडणूक आयोगाने याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती कळवली आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचा ठरवले असून एक अहवाल तयार केला जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेने मतदार म्हणून नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करताना इलेक्ट्रर्स फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) तातडीने मिळेल म्हणून अनावधानाने सहा वेळेस अर्ज भरल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Voter List : मतदार यादीत एकाच महिलेचं तब्बल सहा वेळा नाव; नालासोपारा मतदारसंघातील प्रकाराने खळबळ, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश