Raj Thackeray On Kabutar Khana मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. तसेच दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज  (Jain Community) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता कबुतरखानाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल. जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे काय काय रोग होतात ते ही समजलं पाहिजे. कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असं राज ठाकरेंनी सांगितले. काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, असंही राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढांनाही झापलं-


कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. यादरम्यान, राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय,  मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.


जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचं राज ठाकरेंना साकडं- (Jain Muni On Raj Thackeray)


जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील साकडं घातलं आहे. तुम्हाला मराठी हिंदुहृदयसम्राट म्हणतात. तुम्ही मराठी-मारवाडी वाद मिटवा. तसेच आम्ही मारवाडी लोक देखील तुमच्यासोबत आहेत. जो कोणी मराठी भाषेचा अपमान करतील, जो मराठी भाषेला सन्मान देत नाही, त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं जैन मुनी निलेशचंद्र यांनी सांगितले. तसेच मराठी लोकांची मी माफी मागतो, मराठी एकीकरण समितीचा गैरसमज झालाय, असंही जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले. 




संबंधित बातमी:


Jain Muni on Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, नेमकं काय म्हणाले?


Kabutar Khana: श्वासापासून त्वचेपर्यंत...कबुतरांमुळे कोणते आजार होऊ शकतात?; पाहा A टू Z माहिती