सांगली: महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या सांगलीच्या जागेचा तिढा (Sangli Lok sabha Election) अद्याप काही सुटत नसल्याचं चित्र आहे. सांगलीमध्ये काँग्रेस सक्षम आहे, त्यामुळे या जागेचा फेरविचार करावा अशा आग्रह आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला. पण विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील (Pratik Ambedkar) आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीवर कोणतंही भाष्य मात्र केलं नाही हे विशेष. त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या मनात चाललंय तरी काय हे पाहावं लागेल. 


महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगलीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यामध्ये जाऊन भेट घेतली होती.  त्यामुळे विशाल पाटील हे आता वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणार अशी चर्चाही सुरू झाल्याचं दिसतंय. 


विश्वजित कदमांचे कोणतेही भाष्य नाही


सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे भलतेच नाराज झाल्याचं दिसतंय. विश्वजित कदमांनी यावर एक पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी, उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा अशी विनंती केली. पण प्रतिक पाटलांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भेट का घेतली, विशाल पाटलांची वंचितमधून तयारी सुरू आहे का यावर कोणतंही भाष्य केलं नाही. 


वादळापूर्वीची शांतता आहे का? 


विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरावा, नंतरचे पाहू असा संदेश प्रकाश आंबेडकरांनी दिला असल्याची माहिती आहे. परंतु विश्वजित कदमांनी मात्र त्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. तसेच बाजूला बसलेल्या विशाल पाटलांनींही त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे का हे पाहावं लागेल. 


काय म्हणाले विश्वजित कदम?


सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो काँग्रेसकडेच राहावा यासाठी आम्ही दिल्लीपर्यंत प्रयत्न केले. त्यामध्ये ज्या ज्या वेळी बैठक होईल त्या त्या वेळी सांगलीच्या जागेवर चर्चा केली. सांगलीची जागा ही काँग्रेस पक्ष लढायला सक्षम असून ती आपल्यालाच मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळेच या जागेवर आम्ही दावा केला.


कोल्हापूरची जागा ही शाहू महाराजांसाठी काँग्रेसला देण्यात आली. त्यावेळी शिवसेनेने सांगलीच्या जागेवर दावा केला, आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. तो निर्णय एकतर्फी होता आणि इतर पक्षांना विचारण्यात आलं नाही अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केला. 


सांगलीचा राजकीय इतिहास काय आहे, कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे हे जरी महाविकास आघाडीने लक्षात घेतलं असतं तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती. महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केलं आणि सांगलीची जागा शिवसेनेला गेली.


सांगलीची राजकीय परिस्थिती लक्षात घ्यावी आणि त्यावर फेरविचार करावा. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहोत यावर काही दुमत नाही. पण सांगलीच्या जागेवर पुन्हा निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही करतोय.


एखादी वाईट घटना घडली तर ती पचनी पडायला वेळ लागतो. काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही जागा मिळाल्यानंतर आमची स्थिती तशीच काही आहे. आताही एकमेकांना धीर देत आहोत. सांगलीची जी काही वस्तुस्थिती आहे ती लक्षात घ्यावी आणि फेरविचार करावा. 


विशाल पाटील कार्यकर्त्यांना भेटतील


येत्या काळात विशाल पाटील हे व्यक्तिगतरित्या कार्यकर्त्यांना भेटलीत आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेतील. येणाऱ्या काळात वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी घालणार आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या गोष्टीवर हल्लाबोल करून त्यांना सत्तेतून हद्दपार करणे हेचं अंतिम ध्येय आहे. 


ही बातमी वाचा: