Vishal Patil on Sharad Pawar and Udhhav Thackeray : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज (दि.21) पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून अमित शाहांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार केला. शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार आहेत, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमित शाहांच्या टीकेनंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर त्यांना मिळणारी सहनभूती वाढणार, असं विशाल पाटील (Vishal Patil ) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
शेतकऱ्यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडतील ही अपेक्षा आहे
विशाल पाटील म्हणाले, 2024 चा बजेट या अधिवेशनात मांडला जाईल. अपेक्षा आहे या सरकारने जानेवारीत अर्थसंकल्प मांडला, तसाच मांडला तर देशासाठी ती निराशा असेल. शेतकऱ्यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे प्रमुख मुद्दे या अधिवेशनात मांडायचे आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मला बोलायचं होत, मात्र ती संधी मिळाली नव्हती. या अधिवेशनात राज्याच मुद्दे मांडण्याची संधी मिळेल ही अपेक्षा आहे.
भाजपने राज्यातील प्रमुख 2 नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतय
पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, महागाई, बेरोजगारी हा देशापुढचा मुद्दा आहे. हे जगजाहीर आहे की, मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिलं. शरद पवार यांच्याकडे सर्व समाज अपेक्षेने पाहतात. भाजपने राज्यातील प्रमुख 2 नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतय. तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं तर त्यांची सहनभुती ही वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी राजकारणाच्या पलिकडे पुण्यात बोललं पाहिजे होते, पण दुर्दैव ते काहीच बोलले नाहीत. हिंदू मुस्लिम करून निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो राज्यात चालला नाही.
आम्ही कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत
असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल. दीड लाखापर्यंत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे, पण २० फुटाच्या पुढे पुरची पातळी गेली आहे. अधिवेशनात हा प्रश्न मी मांडणार आहे. आम्ही कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन यावर विचार करण्याची गरज आहे. पुन्हा पुर येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करणार आहे, असंही विशाल पाटील यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या