कोल्हापूर : छत्रपती कुटुंबाने (Chhatrapati Family) राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही, असं म्हणत वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी निशाणा साधला आहे. छत्रपती कुटुंबाने नावाला साजेसं काम केलं नाही, ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं आहे, असं वक्तव्य खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक (Virendra Sanjay Mandlik) यांनी केलं आहे. कागल मधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी हे वक्तव्य केलं आहे.


वीरेंद्र मंडलिकांची छत्रपती कुटुंबावर टीका


राजर्षी  शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही, असं म्हणत वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे तुम्हीच आहात, असंही वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : काय म्हणाले वीरेंद्र मंडलिक?



कोल्हापुरात लढत कुणामध्ये?


कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने काँग्रेसकडून कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे आहेत. कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची संपत्ती 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपये आहे. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये एवढी आहे.


मिलिंद देवरा काय म्हणाले?


मिलिंद देवरा यांनीही संजय मंडलिक यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. यावेळी मिलिंद देवरा म्हणाले की, संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभा राहील. काँग्रेस काय आहे, हे मला चांगलं माहिती आहे. काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत. वर्षा गायकवाड ही माझी बहिण आहे. माझे वडील आणि वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचे जुने संबंध होते. काँग्रेसने दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला. काँग्रेसची भूमिका दलित विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. पूर्ण राज्यात काँग्रेसवर खूप नाराजी आहे, असं मिलिंद देवरा म्हणाल आहेत.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


'श्रीमंत' शाहू छत्रपती अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही ; निवडणुकांमुळे समोर आली संपत्तीची माहिती