मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) लंडनहून (London) आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh) ही शिवरायांची नाहीत असा दावा करत होते. आज त्यांच्या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने (Victoria and Albert Museum) पुष्टी दिल्याचे इंद्रजित सावंत यांचे म्हणणे आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे.  


लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj)  आहेत, याचा कुठलाही पुरावा नाही, असं पत्र म्युझियमनं पाठवल्याची माहिती इंद्रजित सावंतांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. तर महाराष्ट्र सरकार ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा खोटा दावा का करतेय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.  


सरकारकडून जनतेच्या पैशाच्या अपव्यय 


यावर विजय वड्डेटीवार म्हणाले की, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवले आहे, त्यामुळे संशय निर्माण झालाय. ते वाघनखं ओरिजनल आहेत का? या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. गाजावाजा करून वाघनखांच्यासंदर्भात जी भूमिका मांडली, त्याला या पत्रामुळे धक्का बसला आहे. या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारने दिखाऊपणा केलेला आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेळल्याची टीका त्यांनी केली आहे. 


नेमकं काय म्हणाले इंद्रजित सावंत? 


महाराष्ट्र सरकार सध्या जी वाघनखे भारतात आणत आहेत. ती 1971 साली व्हिक्टोरिआ अल्बर्ट म्युझिअमला गेली आहे. तशी सध्या सहा वाघनखे त्यांच्याकडे आहेत. ब्रिटिश म्युझिअम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय आहेत. ज्या संग्रहालायातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणत आहेत. ते संग्रहालय सांगत आहे की, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.  याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे, असे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने पत्रात लिहिले असल्याचे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येणार तरी कधी? सुधीर मुनगंटीवार म्हणाले....