Chhatrapati Shivaji Maharaj's Iconic Tiger Claws : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं (Wagh Nakh) ही भारतात आणण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली होती. आपल्या जाज्वल्य इतिहासातील अमूल्य ठेवा मायभूमीत परत यावा, याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातचं ही वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अनेक कारण पुढे येत ही प्रक्रिया लांबणीवर गेली.


अशातच या वाघनखांच्या विलंबनावरून राज्याच्या राजकारणातही अनेक आरोप-प्रत्यारोप करत राजकारणही तापले होते. असे असले तरी ही वाघनखे नेमकी कधी महाराष्ट्रात येणार? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. यावर आता स्वत: मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली आहे. 


वाघनखे महाराष्ट्रात नेमकी कधी येणार?


सध्याघडीला चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या बाबत विचरले असता ते म्हणाले की, देशभरातील समस्त शिवप्रेमी, नागरिकांची भावना लक्षात घेता आम्ही या संदर्भात प्रमाणिक प्रयत्न केले आहेत. वाघनख भारतात आणण्यासाठी आम्ही करारही केलाय. त्यावेळी 4 मे ही तारीखही निश्चित झाली असून त्यासाठीची सर्व तयारी देखील केली होती. मात्र, तेव्हा निवडणूक निश्चित झाली नव्हती. त्यानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तारीख झाली आणि मग निवडणूक आयोगाने वाघनख आणण्याबद्दल त्यांच्या हरकती सांगितल्या. त्यात त्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्या की, राजकीय नेत्यांना तिथे जाता येणार नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यावर म्हणजे साधारणतः 10 जून पर्यंत वाघनखं येतील. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 


आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला 350 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या 20 जूनला तिथी प्रमाणे शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येण्याची विनंती केली आहे. या शिवकार्यासाठी माझी स्वतः लंडनला जाण्याची इच्छा आहे. पण 10 जूनपर्यंत मी कोणत्या पदावर आहे, हे मला सांगता येणार नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगणार आहे. मी स्वतः च्या व्हिजा साठी देखील प्रोसेस सुरु केली आहे. तसेच पुढील प्रक्रियेसाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. कारण त्यांच्या परवानगीचं पत्र हे लंडन म्यूजियमला द्यायचं आहे. येत्या 15 जूनपर्यंत आचारसंहिता कुठल्याही परिस्थितीत संपेल. त्यामुळे फक्त निवडणूक आयोगाकडून त्याआधी पत्र मिळालं तरी आमचं काम होईल. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या  


Maharashtra Politics : नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल