Vijay Shivtare on Baramati Loksabha : "बारामतीत महायुतीची जागा निवडून यावी. असं सर्वांचं मत होतं, पण मला माहिती आहे की, ही  जागा मी अपक्ष म्हणून 1 हजार टक्के जिंकली असती. कारण दोन्ही उमेदवारांना किती विरोध होता? हे मला माहिती आहे. इथे पक्ष नाहीयेत, इथे दोनच प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक पवार प्रो आणि दुसरा पवार विरोधी आहे. 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतदान आहे. त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करायचे नव्हते. त्यांना मतदानाची संधी द्यावी म्हणून लोकशाहीतील पवित्र काम मी करतोय, असं मी बोललो होतो. मी कोणाच्या विरोधात बोललो नव्हतो", असं शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले. बारामतीची जागा (Baramati Loksabha) अपक्ष लढलो असतो तर मी निवडून आलो असतो, असा विश्वास शिवतारे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. 


विजय शिवतारेंची महायुतीच्या नेत्यांनी केली होती मनधरणी 


विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी विजय शिवतारेंची समजूत काढावी लागली होती. विजय शिवतारे अजित पवार यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती. शिवतारे अजित पवार यांच्याविरोधात टोकाची वक्तव्य करत होते. दरम्यानच्या काळात शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. 


बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय 


बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. त्यामुळे अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर गेला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती विधानसभेमधूनच सुप्रिया सुळे यांना मिळाले होते. अजित पवारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जवळपास दीड लाखांचे मताधिक्य आहे. त्यामुळे अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का? अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी शरद पवारांकडे केली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Omprakash Rajenimbalkar Meets Manoj Jarange Patil : ओमराजे थेट अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंना म्हणाले, पाणी प्या, तामिळनाडूचा दाखला देत केंद्रावर हल्ला!