मुंबई :  महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   त्यामुळे  महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.   महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती  महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचे काम देण्याचा विचार  काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे 


आगामी विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आली आहे.  महाविकासआघाडी आणि महायुती दोघांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती  महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचे काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत विचार हा विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल त्यामुळे फक्त प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असा विचार काँग्रेसकडून समोर आला आहे.  तर यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचे काम  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण करणार आहेत.   


महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा  केली जाणार का?


पृथ्वीराज चव्हाणांकडून लवकरच  विधानसभा निवडणुकीसाठीच्या महाविकास आघाडीचा तयार करून जाहीर केला जाईल .  प्रचार प्रमुखासंदर्भात  अधिकृत  घोषणा महाविकास आघाडीकडून झालेली नाही.  उद्या महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला संयुक्त मेळावा होणार आहे.  यामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार का ?  याबाबत महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा  केली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.


राजकीय विश्लेषक रविकुमार देशमुख काय म्हणतात?


राजकीय विश्लेषक रविकुमार देशमुख म्हणाले,  प्रत्येक पक्षाला वाटते आपल्या कार्यकर्त्यांनी जोमाने करावे यासाठी पक्षाला एक आश्वासक चित्र करावे लागते. जसे की मुख्यमंत्री पद हे आपल्याच पक्षाल मिळणार, आज ती काँग्रेस पक्षाची आहे त्यात काही शंका नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, लोकसभेला काँग्रेसने दुय्यम भूमिका घेतली होती.त्यामुळे त्यांना पुरेपूर माहीत होते की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चालत आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले पाहिजे. त्यामुले काँग्रेसने फारशी आक्रमक भूमिका न घेता अतिशय व्यवस्थिक काम केले त्याचं त्यांना यश लोकसभेच्या निवडणुकीत मिळाले. आज महाराष्ट्रात जेव्हा सत्ता येण्याची शक्यता वाटत आहे तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रपदी आपला उमेदवार असावा त्यामुळे काँग्रेस असे दाखवत आहे की आमच्या जागा जास्त येतील आम्हाला मुख्यमंत्री पद द्या...  मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज कधी नव्हे ती फार  संकटात आहे.  त्यांना निवडणुकीत उभे राहायचे आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना जर हे पद आपल्याकडून जाताना दिसत असेल तर त्याचा कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे हा संघर्ष निवडणुका होईपर्यंत धुमसत राहणार आहे. मात्र हा समजुतदारपणा दोन्ही बाजूचे नेते कसे दाखवतात याच्यावर खूप काही अवलंबून आहे. 


महाविकासआघाडीमध्ये कोणाचा चेहरा जास्त आश्वासक? 


आज महाराष्ट्रात  महाविकासआघाडीमध्ये कोणाचा चेहरा चालत असेल तर तो उद्धव ठाकरेंचा आहे.  उद्धव ठाकरेंना स्वत:चा दुंभगलेला पक्ष उभा करायचाय आणि महाराष्ट्राला पर्याय द्यायचा आहे.  त्यांच्यावर जर खरच अन्याय झाला असेल असे वाटत असेल महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील तो फायदा त्यांना मिळवायचा आहे. सहानुभुतीचा फॅक्टर कितीही राजकीय नेते कितीही म्हणत असोत नसोत शेवटी वस्तूस्थितीवर  सगळ असतात.  राजकीय नेत्यांन त्यांचे नरेटिव्ह तयार करायचे असतात  त्यामुळे दुर्लक्ष केले तरी जनमानसात वस्तूस्थिती वेगळी असते.  त्यानुसार गेले तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आजही काँग्रेस पक्ष लोकसभेप्रमाणेच विधानसभेला आहे ती समीकरणे स्वीकारुन विधानसभेला मोठा पक्ष म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. 


Video :  विधानसभा निवडणुकीचा प्रचार  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  होणार?