Vidhan Parishad Election Result Live Updates : अनिल परब यांनी बाजी मारली, पण नाशिकमध्य मतमोजणी सुरूच, उमेदवारांत धाकधूक!

Vidhan Parishad Result Updates : आज विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

प्रज्वल ढगे Last Updated: 02 Jul 2024 07:32 AM
Nashik Teachers Vidhan Parishad Election Result : मोठी बातमी! नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी, शिंदेंच्या शिवसेनेचा बोलबाला

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीचे संदीप गुळवेदेखील बाद झाले. विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित करण्यात आला होता. विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक होती. 

नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमजोणी सुरूच, मविआचे संदीप गुळवे बाद, किशोर दराडे आघाडीवर 

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक


- पहिल्या पसंतीत विजयाचा  कोटा पूर्ण झाल्यानं, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू

- तब्बल 24 तासांपासून नाशिकमध्ये मतमोजणी सुरूच

- पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर


- बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद


- माहाविकास आघाडीचे संदीप गुळवेदेखील झाले बाद 


- विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित

- विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक


- अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि दराडे यांच्या सुरू आहे रस्सीखेच

Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा विजय निश्चित

मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांचा विजय निश्चित झाला असून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मतदारांनी 
भाजपला नाकारून अनिल परब यांना निवडून दिले यात आनंद असल्याचे वरून सरदेसाई यांनी सांगितले. 

Vidhan Parishad Election Result : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरेंची मोठी आघाडी

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांची मोठी आघाडी


निरंजन डावखरे यांना ३५ हजार मत तर रमेश कीर यांना ७ हजार मतं


मतमोजणीचा एक राऊंड, पूर्ण आणखी दोन राऊंड बाकी

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत चुरशीची लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू


पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात काटे की टक्कर


सर्वच टेबलवर सुरू आहे चुरशी लढाई


तीनही उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच

मुंबई पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आघाडी, अनिल परब दुसऱ्या फेरीतच विजयाच्या दिशेने

- मुंबई पदवीधर मतदार संघात आघाडी
- ⁠उबाठा गटाचे अनिल परब यांना आघाडी 
- ⁠भाजपा आणि उबाठा उमेदवारांमध्ये मतांमध्ये मोठा फरक 
- ⁠४ पैकी २ फेरीतच अनिल परब हे जाहीर मतांचा कोटा गाठण्याच्या दिशेने

Mumbai Vidhan Parishda Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत कोणीही मतांचा कोठा गाठला नाही, दुसऱ्या प्रेफरन्सची मतं मोजायला सुरूवात

मुंबई शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत कोणीही मतांचा कोठा गाठला नाही


त्यामुळे पुन्हा एकदा दुस-या प्रेफरन्सची मत मोजायला सुरुवात केली आहे


ठाकरे गटाचे अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे मोरे यांच्यात लढत

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिकमध्ये मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकमेकांची मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ


मराठी अक्षरात 1 आकडा काढला असेल तर त्याला इंग्रजी 9 समजून घेतला जात आहे आक्षेप


हस्ताक्षरातील चूका शोधून मत बाद ठरविण्याकडं आहे कल


आक्षेप घेतलेले मत डाऊटफुल बॉक्समध्ये टाकले जात आहेत


ज्या मतांवर आक्षेप आहे त्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी घेणार निर्णय


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या पसंती क्रमांकांना रिंगण केले किंवा एकच पसंती क्रमांक दोन उमेदवाराला दिले असे मत ठरविले जात आहेत बाद


बाद मते रिजेक्ट बॉक्समध्ये टाकली जात आहेत

Mumbai Vidhan Parishad Teachers Constituency Election : मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर 

मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर 


ज मो अभ्यंकर यांना पहिल्या फेरीत ६१ मतांची आघाडी 


तर शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात, महायुती अन् मविआत चुरस

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, महायुतीचे किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे संदिप गुळवे यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Mumbai Vidhan Parishad Teachers Constituency Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात 402 मतपत्रिका अवैध, विजयी उमेदवारासाठी 5800 मतांचा कोटा

विधानपरिषद कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक व  मुंबई पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अपडेट


तीनही मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण. 


कोकण पदवीधर मतदारसंघ


• 321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण. 


• एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या. 


• आता प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु. एकूण 4 फेऱ्या होतील. 


• त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल. 


मुंबई पदवीधर 


• एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.


• मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु. 


• त्यानंतर कोटा ठरेल. 


मुंबई शिक्षक मतदारसंघ


• एकूण 12 हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे. 


• यातील 402 मतपत्रिका अवैध आढळल्या. 


• 5800 हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे. 


• प्रत्यक्ष मतमोजणी सुरु सुरुवातीस पहिल्या  पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु होईल.

Mumbai VidhanParishad Election Result : मुंबई शिक्षक मतदारसंघात विजयासाठीचा कोटा ठरला

मुंबई पदवीधरमधील पहिल्या टप्प्यातील मतपत्रिकांची मोजणी योग्य आहे का याची तपासणी पूर्ण


६७६४४ मतपत्रिका आढळल्या आहेत.


त्या वैध की अवैध याची तपासणी सुरु..


मुंबई शिक्षक मतदारसंघ -


एकूण १२ हजार महापत्रिका आहेत त्या योग्य आहेत का याची तपासणी पूर्ण.


मुंबई शिक्षकमधील ४०२ मतपत्रिका अवैध ठरल्या.


जिंकण्यासाठीचा कोटा ५८०० इतका ठरवण्यात आलाय.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंकडून दखल

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची उद्धव ठाकरेंनी यांनी घेतली दखल

मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळाची घेतली माहिती

नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारली माहिती

मतमोजणी प्रक्रियेत 3 मत जास्त आढळून आल्याने उडाला होता गोंधळ

जास्त मत आढळून आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली याबाबतीत विचारली माहिती

Nashik Teacher Election Result : तीन अतिरिक्त मतपत्रिकांमुळे संदीप गुळवेंचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा!

- मतदानापेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्या...


- उमेदवार संदीप गुळवे यांनी केली चौकशीची मागणी..


- मी सुरुवातीपासून सांगत होतो, बोगस मतदान सुरू आहे...गुळवे


नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना चोपडा येथील मतदान केंद्रावर 935 मतदान झालेले असताना 938 मतपत्रिका निघाल्या. तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी हे बोगस मतदान झाल्याचे द्योतक असल्याचे सांगितले. मी पहिल्या दिवसापासून आयोगाला सांगत होतो की दराडे आणि शासनाचे काही माणसे चुकीचे काम करत आहे. ते आता मतपेटीतून बाहेर येत आहे. या मतपत्रिकांची व संबधित निवडणूक प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी उमेदवार गुळवे यांनी केली आहे.

Mumbai Teachers Constituency Election Result : मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतं वैध किंवा अवैध ठरवण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतं वैध किंवा अवैध ठरवण्याची प्रक्रिया सुरू


तर कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघांच्या मतांची टॅली सुरु  


यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल....

मोठी बातमी! तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे ठाकरे गट आक्रमक, नाशिकमध्ये मतमोजणी थांबवण्याचा निर्णय!

नाशिक - मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त

- टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा 3 मतपत्रिका निघाल्या जास्त


- 3 मतपत्रिका जास्त निघाल्याने मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली

- जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबवळवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्याचा कामाला सुरुवात  

- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप

Nashik Teacher Election Result : सुरुवातीपासूनच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस

मतमोजणी केंद्रावर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पोहचले


ठाकरे गटाचे पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर दाखल

सुरुवातीपासूनच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे

पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे करून कुणाला किती मतदान पडले हे कळणार

नवी मुंबई - मतदानकेंद्रानिहाय मतपत्रिकांचा हिशोब जुळवला


वैध - अवैध मतपत्रिका छानणी सुरू झाली आहे


या नंतर 25 चे गट्टे करून 29 डेबलवर देणार 


मतमोजणी सुरू होण्यास 12 वाजू शकतात


पहिला टप्पा , दुसरा टप्पा असे करून कुणाला किती मतदान पडले हे कळणार

Konkan Graduate Election Result : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल आहेत. मुंबई पदवीधरसाठी 28 आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून खबरदारी

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत... 


यामध्ये मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत 


लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा ठाकरे गटाने आरोप केला होता 


यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता

Nashik Teacher Constituency Result : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरवात 

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरवात 
सुरवातीला मतपेट्यामधील मतं पत्रिका बाहेर काढल्या जातील

Nashik Teacher Constituency Result : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निकालासाठी अशी होणार मतमोजणी

- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी 


- सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात 


- 30 टेबलवर होणार मतमोजणी 


- प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी करणार मतमोजणी


- कोटा पद्धतीमुळे निकाल यायला उशीर होण्याची शक्यता


- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 93 .48 टक्के मतदान


- 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार

- पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील


- त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार

- मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार


- सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार 


- याप्रमाणे कोटा पूर्ण होईल पर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार 


- सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार

Teacher And Graduate Election Result Live Updates : नाशिक शिक्षक मतदारसंघात कोणाचा विजय होणार?

नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मतदारसंघात बैठका घेऊन मोर्चे बांधणी केली होती. महायुतीने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाचा मार्ग सोपा असेल या अशी परिस्थिती असताना महायुतीने किशोर दराडे हेच एकमेव महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा केली. विरोधकांकडून निवडणुकीत किशोर दराडे यांच्यावर पैसे वाटण्याच्या आरोप देखील करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. निकालाच्या दिवशी महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी घरात देवदर्शन केले आणि कुटुंबियांकडून किशोर दराडे यांचे औक्षण करण्यात आले. किशोर दराडे यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.  

Teacher And Graduate Election Result Live Updates : विधानपरिषद निवडणुकीत कोण कोण रिंगणात? 

विधानपरिषद निवडणुकीत कोण कोण रिंगणात? 


मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत 


ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट 
शिवनाथ दराडे : भाजप 
सुभाष मोरे : शिक्षक भारती  
शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 


मुंबई पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार


अनिल परब शिवसेना ठाकरे गट 
किरण शेलार : भाजप 


कोकण पदवीधर मतदारसंघ


निरंजन डावखरे : भाजप 
रमेश कीर : काँग्रेस


नाशिक शिक्षक मतदारसंघ :


किशोर दराडे : शिवसेना 
विवेक कोल्हे : अपक्ष
संदीप गुळवे : शिवसेना ठाकरे गट
महेंद्र भावसार : राष्ट्रवादी काँग्रेस 

Teacher And Graduate Election Result Live Updates : शिक्षक, पदवीधर निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत!

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी निवडणूक घेण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक घेण्यात आल्यामुळे तिला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगली.

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. पुण्यात नुकतेच घडलेले पोर्शे कार अपघात प्रकरण, सापडलेले ड्रग्ज, पोलीस भरती, शेतकऱ्यांसाठी मदत या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल करत आहेत. तर सत्ताधारीही पूर्ण तयारी करून विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन होत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे आज अधिवेशनादरम्यान काय काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अद्याप चालूच आहे. एकूण चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. या घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट वाचा एका क्लीकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.