Maharashtra Legislative Council Election 2024 : मुंबई : आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे. महायुतीचे (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर महा विकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) 3 उमेदवार रिंगणात आहेत. अशातच विधानपरिषद निवडणुकीपूर्वी (Vidhan Parishad Nivadnuk) राजकीय वर्तुळातून सर्वात खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच, भाजपनंही काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा रंगली आहे. 


विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार असल्याचं बोललं सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 46 मतांचं गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसमधूनच 4 मतांची रसद पुरवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


विधान परिषद निवडणुकीपूर्वी गुरुवारी रात्री राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. रात्रीतल्या रात्री घोडेबाजार झाला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चार आमदार फोडले आहेत, तर भाजपनंही काँग्रेसचे चार आमदार फोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच, काँग्रेसचे आठ आमदार फोडल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू होती. तर दुसरीकडे भाजपचीही ताज प्रेसिडंट कुलाबा येथे उशिरापर्यंत बैठक सुरू होती. 


विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार : सूत्र 


आधीपासूनच काँग्रेसच्या बाबतीत कुठेतरी शंका उपस्थित केली जात होती. कारण विधान परिषदेचं गणित पाहिलं तर काँग्रेसकडेच अधिकची मतं असल्याचं लक्षात येतं. सध्या विधान परिषदेसाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर उरलेली जी मतं राहतात, ती मतं फुटतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या शक्यतेवरतीच कुठेतरी शिक्कामोर्तब होईल, अशी चिन्ह दिसत आहेत. अशातच एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 8 काँग्रेसचे आमदार क्रॉस वोटींग करण्याची शक्यता असून विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याचं दिसत आहे. 


आमदार फोडण्यामागे नेमकी रणनीती काय? 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काँग्रेसचे 5 आमदार फोडले असून भाजपकडून देखील काँग्रेसचे 4 आमदार फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे एकूण 8 आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार आहेत. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती एबीपी माझाला दिली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे 40 आमदार 2 अपक्ष आणि काँग्रेसच्या चार आमदारांची अशी एकूण 46 मतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्स मध्येच निवडून येण्याची दाट शक्यता


मुख्यमंत्र्यांनी ताज लँड्स एन्डमध्ये रात्री उशिरा बैठक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये रात्री उशिरा बैठक घेतली. यावेळी शिंदेंनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. दरम्यान शिंदे गटातील सर्व आमदार थोड्याच वेळाच एका बसमधून विधान भवनला जाणार आहेत. ही बस ताज लँड्स एन्ड हॉटेलला येईल त्यानंतर आमदार विधानभवनला रवाना होतील.


पाहा व्हिडीओ : Congress MLA Cross Voting : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 आमदार फोडल्याची चर्चा



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


विधानपरिषदेत कुणाचे वाजणार 'बारा', किचकट राजकीय गणितात कोण कुणाला शह देणार? आज फैसला