Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Agahadi) जगावाटपात वर्सोवा मतदारसंघावरुन असेलाल तिढा अखेर निकाली निघाला आहे. वर्सोव्याची (Versova) जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. वर्सोव्यातून माजी नरगरसेवक हरुन खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर विले पार्लेच्या जागेवरुन वाटाघाटी आप सोबत सुरु होती. मलबार हिलच्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला विलेपार्ले सुटली आहे. या मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांचं माव निश्चित करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाकडून कल्याण पूर्वमधून धनंजय बोराडे यांना संधी
दरम्यान, कल्याण पूर्वमधून ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे यांना संधी देण्यात आली आहे. या ठिकाणचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी अटकेत आहेत. त्यामुळं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. आज ठाकरे गटाकडून कल्याण पूर्व मधून धनंजय बोराडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांसह छोट्या पक्षांकडून महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. मुंबईतील जागा वाटपाबाबत मविआत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 23 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर
ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा,अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चेंबुर, कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम,चांदिवली, मुंबादेवी,धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम-अस्लम शेख,चांदिवली- नसीम खान, मुंबादेवी- अमनि पटेल,धारावी- ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: